ऑनलाइन लोकमत
बेंबळे, दि. १ - पावसाळा सुरू होऊन जून व जुलै असे दोन महिने संपले तरी उजनी धरणात केवळ ३२ टक्के पाणी आले आहे़ त्यामुळे उजनी धरण १०० टक्के भरण्यासाठी अजून १२८ टक्के पाणी येणे आवश्यक आहे़ सध्या वजा २८ टक्के पाणी आहे़
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उजनीवरील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अपेक्षित पाऊस झाला नाही़ परिणामी त्या धरणातून खाली पाणी सोडण्यासारखी स्थिती नाही़ गेल्या दोन महिन्यांत उजनीत अपेक्षित पाणी आले नाही़ त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाºया शेतकºयांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण आहे़ पावसाळ्यापूर्वी उजनी धरणात वजा ५४ टक्क्यांपर्यंत पाणी खाली गेले होते़ ही मायनसची विक्रमी पातळी ठरली होती़ यानंतर जूनमध्ये या पातळीत कसलीच वाढ झाली नाही़ जुलैपासून सुरू झालेल्या पावसामुळे उजनी धरण वजा ५४ टक्क्यांवरून ते वजा २८ टक्क्यांपर्यंत पाणी आले आहे़ हे २६ टक्के पाणी आणि आषाढीवारी व सोलापूरला पिण्यासाठी म्हणून ३़५४ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे सर्व मिळून ३२ टक्के पाणी उजनीत धरणात जमा झाले़ मात्र यापेक्षा ४ पट म्हणजेच १२८ टक्के पाणी उजनी धरणात येणे गरजेचे आहे़ आनंदाची बाब म्हणजे उजनीवरील १९ धरणांपैकी १४ धरणांतील पाणीस्थिती सुधारली आहे़ कारण येथून पुढे येणारा पाऊस व पाणी थेट उजनी धरणात येणार आहे़
उजनीची सद्यस्थिती
- पाणीपातळी - ४८८़६१० मीटर
- एकूण पाणीसाठा - १३७५़४९ दलघमी
- उपयुक्त पाणीसाठा - वजा ४२७़३२ दलघमी
- टक्केवारी - वजा २८़२७ टक्के
- दौंडमधून विसर्ग ८६५ क्युसेक्स
- बंडगार्डन २९१६ क्युसेक्स
टेल टु हेड नियम पाळण्याची गरज
पाणी साठ्यासाठी टेल टु हेड हा नियम आतापर्यंत केवळ कागदावरच राहिला आहे़ उजनी धरण किमान ५० टक्के येईपर्यंत वरील १९ धरणांतून पाणी खाली सोडणे आवश्यक आहे़ जोपर्यंत टेलला असलेल्या उजनी धरणात ५० टक्के पाणीसाठा होत नाही तोपर्यंत टू हेड असणाºया एकाही धरणात पाणी अडवता कामा नये़ असा कायदा असूनही याचे पालन कोणीही करत नाही़ त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाºया शेतकºयांना त्या १९ धरणांच्या पाणीसाठ्याकडे लक्ष द्यावे लागते़
वरच्या धरणाची स्थिती
- येडगाव ८४़५० टक्के, वडूज ७५़०८ टक्के, डिंभे ४५़७६ टक्के, कलमोडी १०० टक्के, चासकमान ६७ टक्के, भामा आसखेड ५४़१० टक्के, वडिवाले ७३़०७ टक्के, आंध्रा ७३ टक्के, कासारसाई ८४ टक्के, मुळशी ६८ टक्के, वरसगाव ५४ टक्के, पानशेत ६४़०३ टक्के, खडकवासला ७५ टक्के, खोड ४९ टक्के़ केवळ विसापूर, माणिकडोह, पिंपळगाव जोगे या धरणांची स्थिती बिकट आहे़
ऊस लागवडी थांबल्या
उजनी धरणात अद्यापपर्यंत पुरेसा पाणीसाठा झाला नसल्यामुळे १ आॅगस्टच्या आत होणाºया आडसाली उसाच्या लागवडी पूर्णपणे थांबल्या आहेत़ कारण गेल्या दुष्काळात होरपळून निघालेला शेतकरी उजनीत पुरेसा पाणीसाठा झाला तरच ऊस लागवड करण्याचे धाडस करेल अन्यथा नाही़ .