शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

युजीसीच्या शिष्यवृत्तींमध्ये घसघशीत वाढ

By admin | Updated: December 21, 2014 01:40 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोळा प्रकारच्या शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने जवळपास ५० टक्कयांनी वाढ केली आहे.

वाशिम : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोळा प्रकारच्या शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने जवळपास ५० टक्कयांनी वाढ केली आहे. डिसेंबरपासून याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) निवृत्त विद्वान प्राध्यापक, बेरोजगार महिला, डॉ. राधाकृष्णन मानवता व सामाजिक शास्त्र आणि भाषा, स्वामी विवेकानंद समाजशास्त्र आदी प्रकारच्या शिष्यवृत्तींचा यामध्ये समावेश आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने या शिष्यवृत्तींमध्ये यंदापासून घसघशीत वाढ केली आहे. याचा फायदा उच्च शिक्षण घेणाऱ्या गुणवंत तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार आहे. निवृत्त झालेल्या विद्वान प्राध्यापकांचा शैक्षणीक क्षेत्रात उपयोग करुन घेण्याच्या उद्देशाने त्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती दरमहा वीस हजारावरुन एकतीस हजार रुपये करण्यात आली आहे. बेरोजगार महिलांची शिष्यवृत्ती २५ हजार रूपयांवरून ३८,८०० रूपये करण्यात आली आहे. डॉ. राधाकृष्णन मानवता व सामाजिक शास्त्र आणि भाषा या विषयांसाठी देण्यात येणारी २५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती आता ३८ हजार ८०० रूपये करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद एकुलत्या मुलीसाठी सजामशास्त्र विषयासाठी देण्यात येणारी ८ हजार रूपयांची शिष्यवृत्ती १२ हजार ४०० रुपये, विज्ञान मानवता, सामाज शास्त्र शिष्यवृत्ती १६ हजार रूपयांवरून २५ हजार रुपये, परदेशी विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी १२ हजार रूपयांची शिष्यवृत्ती १८ हजार ६०० रूपये, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर व्यावसायीक शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पाच हजार रूपयांवरून सात हजार ८०० रुपये, गेट, जीपॅट पात्र विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, अभियांत्रीकी आणि औषध निर्माण शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी देण्यात येणारी ८ हजार रूपयांची शिष्यवृत्ती आता १२ हजार ४०० रुपये करण्यात आली आहे. इंदिरा गांधी शिष्यवृत्ती मध्येही ११०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही शिष्यवृत्ती दरमहा दोन हजार रूपये होती. आता तीन हजार शंभर रूपये करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)च्पूर्वी ही शिष्यवृत्ती दरमहा दोन हजार रूपये होती. आता तीन हजार शंभर रूपये करण्यात आली आहे. वाढीव शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी डिसेंबर, महिन्यापासून सुरू झाली असुन राज्यातील सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने जवळपास ५० टक्कयांनी वाढ केली आहे.