शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे गैरसमज हाेण्यास सोबतची माणसेच कारणीभूत, मंत्री दीपक केसरकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 11:44 IST

केसरकर म्हणाले की, आतापर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत कधीच बोललो नव्हतो, पण आता मला बोलणे भाग आहे.

मुंबई : नागपूर विधानभवनातील उपाध्यक्षांच्या दालनात उद्धव ठाकरे आणि माझे जे संभाषण झाले, ते मुळात मीडियात लीक झाले. झाले ते झाले, पण जे लीक झाले, तेही अर्धसत्य होते. त्यांच्या सोबतच्या माणसांकडूनच हे प्रसारमाध्यमांकडे पोहोचले. सोबतचीच माणसे गैरसमज करून देत आहेत. योग्य वेळ येताच, या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा मी करणार, असे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

केसरकर म्हणाले की, आतापर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत कधीच बोललो नव्हतो, पण आता मला बोलणे भाग आहे. अधिवेशनाच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या भेटीविषयी सांगताना ते म्हणाले, आमच्यात जे बोलणे झाले, ते उद्धव ठाकरे यांच्या जवळच्याच माणसांनी मीडियाला सांगितले. कारण तिथे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. त्या घटनात्मक पदावर असल्याने त्या असे बाहेर बोलू शकत नाहीत. 

अब्दुल सत्तार यांचे विधान चुकीचेकृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षांतर्गत त्यांच्या विरोधात जे षडयंत्र सुरू असल्याचे वक्तव्य केले आहे, ते चुकीचेच आहे. त्यांनी पक्षाच्या पातळीवर आधी मांडायला पाहिजे होते, असेही केसरकर म्हणाले.

सरकारही राहणार नाही, गटही टिकणार नाही : राऊतमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे व शिंदे गट पुन्हा एकत्र येतील, असे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यावर  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सरकारही राहणार नाही आणिगटही टिकणार नाही’ अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटात आणखी काही गट निर्माण झाले असून, त्यांच्यात टोळीयुद्धसुरू आहे, हेच केसरकरांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरे