शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंची पाठ फिरत नाही तोच शिवसैनिक शिंदे गटात; ढोलताश्यांच्या गजरात मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 21:22 IST

आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावतीत एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. वाशिम-यवतमाळ करत ठाकरेंनी अमरावतीत काल रात्री मुक्काम केला होता. यावेळी अमरावतीत ठाकरे समर्थक आणि राणा समर्थकांत पोस्टर फाडण्याची स्पर्धा रंगली होती. अमरावतीतील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ठाकरे नागपूरमध्ये जात नाहीत तोच शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

अमरावती शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे. जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांच्या नेतृत्वाखाली तरुण शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

 आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावतीत एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काही बोगस लोक म्हणतात की मी भीक मागायला आलो आहे. होय, मी मतांची भीक मागायलाच आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  तुम्हाला आमदार विकत घेता येतात, पण त्याच पैशातून माणसांना वाचवता येत नाही. माणसं वाचवले तर त्यांच्या आशिर्वादाने तुम्हाला कुणाला विकत घेण्याची गरज लागणार नाही. कामच करायचे नाही. हे फोड, ते फोड करायचे. जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवता, मग तुम्हाला अजूनही इतर पक्ष फोडायची काय गरज? शिवसेना चोरली, आता राष्ट्रवादी चोरताय. देशातील गोष्टी विकायच्या आणि दुसऱ्यांचे चोरायचे. भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, पण त्यांच्यात आत्मविश्वास नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

तुम्ही नामर्द आहातठाकरे पुढे म्हणाले, तुम्ही सत्ताधीश आहात, पण निवडून येईल असे वाटत नाही. म्हणूनच ईडी, सीबीआयला मागे लावता. मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा बाजुला ठेवून समोर या. राजकारणातले नामर्द तुम्ही. तुमचे दोन खासदार होते, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशावरुन शिवसैनिकांनी तुम्हाला खांद्यावर बसून महाराष्ट्रात फिरवलं आणि तुम्हीच आम्हाला राजकारणातून संपवायला निघालात. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना