शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महागाईचा राक्षस खरंच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच आवश्यक, उद्धव ठाकरेंचा मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 08:32 IST

पाच रुपयांची फुंकर म्हणजे नुसती वाऱ्याची झुळूक आहे. महागाईचा राक्षस खरेच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच करावी लागेल, असा सल्ला सामनामधील अग्रलेखातून सरकारला देण्यात आला आहे. 

मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दरात किरकोळ कपात करण्याच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून टीका केली आहे. इंधन दरवाढीच्या भडक्यावर सरकारने घातलेली पाच रुपयांची फुंकर म्हणजे नुसती वाऱ्याची झुळूक आहे. महागाईचा राक्षस खरेच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच करावी लागेल, असा सल्ला सामनामधील अग्रलेखातून सरकारला देण्यात आला आहे. करांच्या बेसुमार ओझ्यामुळेच पेट्रोल–डिझेलचे भाव गगनाला भिडतात,  असे सध्याचे  सत्ताधारी नेते विरोधी पक्षात असताना सांगत होते. त्यामुळे त्यामुळे केंद्र सरकारने मनात आणून करांचे ओझे कमी केले तर पेट्रोल–डिझेलचे दर अवघ्या 50 ते 60 रुपयांवर येऊ शकतील, असा अंदाज उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे- पेट्रोल-डिझेलच्या दररोज होणाऱ्या दरवाढीवरून देशभरात निर्माण झालेला असंतोष उशिरा का होईना सरकारच्या कानापर्यंत पोहोचला- दोन्ही सरकारांनी पेट्रोल-डिझेलची किरकोळ का होईना दरकपात करण्याची घोषणा केली-जनआक्रोश ध्यानात घेऊन छोटी का होईना दरकपात केली याबद्दल सरकारचे आभार- मनमोहन सिंग पंतप्रधान असताना  कच्च्या तेलाच्या किमती थेट 143 डॉलर्स प्रति बॅरलवर जाऊन पोहचल्या तरीही एवढी दरवाढ झाली नव्हती-  मात्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर तेलाच्या किमती 29 डॉलर्सपर्यंत घसरूनही आपल्याकडील पेट्रोल-डिझेलचे भाव चढेच राहिले- केंद्र आणि राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवर जे सतराशे साठ प्रकारचे कर लादले आहेत तेच महागाईचे खरे मूळ - पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ दराएवढीच रक्कम कराच्या रूपाने केंद्र आणि राज्य सरकार वसूल करते. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलचे दर दुपटीवर जाऊन पोहचतात- केंद्राने मनात आणले आणि करांचे ओझे कमी केले तर पेट्रोल-डिझेलचे दर अवघ्या 50 ते 60 रुपयांवर येऊ शकतील- पाच रुपयांची फुंकर म्हणजे केवळ वाऱ्याची झुळूक आहे. महागाईचा राक्षस खरेच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच आवश्यक

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोलGovernmentसरकार