शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: शिवसेना पार्टी फंडाचा पैसा वाटून टाका, आम्हाला काहीच नको; दीपक केसरकरांनी व्हीपवरही भाष्य केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 14:34 IST

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी सेनेची घटना बदलली आणि हक्क स्वतःकडे घेतले. आम्ही महाराष्ट्रात एकत्र काम करणार, आदरापोटी आम्ही शांत आहोत, असा इशारा केसरकर यांनी दिला आहे.

शिवसेना भवन, शाखा आणि पार्टी फंड आम्ही ताब्यात घेणार आहोत असा आमच्याविरोधात एक गैरसमज पसरवला आहे जातोय. परंतू तसे काही नाहीय. आम्हाला यापैकी काहीही नको. उद्धव ठाकरे यांच्याकडून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला काही नको फक्त आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन जायचे आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.

उद्धव ठाकरेंनी सेनेची घटना बदलली आणि हक्क स्वतःकडे घेतले. शिवसैनिकाचे पैसे स्वतःच्या नावावर वळवले हे चुकीचे आहे. आम्ही महाराष्ट्रात एकत्र काम करणार, आदरापोटी आम्ही शांत आहोत. सहानुभूती निर्माण करणे आता बस झाले, आम्ही सहा महिन्यात काय केलं ते दाखवतो, तुम्ही अडीच वर्षात काय केलं दाखवा, असे आव्हान दीपक केसरकरांनी दिले आहे. पार्टी फंडातला पैसा सर्व शिवसैनिकांना  द्यावा, अशी आम्ही मागणी करतो असेही केसरकर म्हणाले.

जे शासन म्हणून आमचे आहे ते आम्ही घेणार, आम्हाला दुसरे काही नको. राऊत म्हणायचे की ते बाळासाहेबांचे एकनिष्ठ आहेत. परंतू त्यांची पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल निष्ठा नाही. जी जबाबदारी शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर दिली होती ती अजून पूर्ण झालेली नाही. दोन हजार कोटींच जे बोलतायत त्यांच्या विरोधात कोर्टात गेलं पाहिजे, माझं मत आज राष्ट्रीय कार्यकारणी मी मांडणार आहे, असे ते म्हणाले. 

व्हीप बजावला तर जे जे चिन्हावर निवडुन आले त्यांना हा व्हीप पाळावा लागेल. ज्यांनी पाळला नाही त्यांच्यावर कायद्याने कारवाई होईल. त्यांना चुकीचं वाटतं असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, असेही केसरकर म्हणाले. 

मुख्यमंत्री लवकरच अयोध्या दौऱ्यावर जातील. योगी सरकार कडून महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा दिली जातेय. यासाठी दौरा थांबवला आहे. लवकरच दौऱ्याची घोषणा करू, असे ते म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDeepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदे