शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:34 IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये, हे दोन ठग माझा महाराष्ट्र लुटताहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "मुलगी शिकली प्रगती झाली आणि १५०० देऊन घरी बसवली" असं म्हणत ठाकरेंनी खोचक टोला देखील लगावला आहे. 

"योजनांचा पाऊस पाडत आहेत. अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. योजना धडाधड सुरू करत आहेत. आमच्या हक्काचे पैसे ढापले. सरकार स्थापन करताना ५० खोके घेतले. गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये. फोडाफोडी, गद्दारी करताना लाज वाटली नाही. आता आमचेच पैसे आम्हाला. हा आमचा महाराष्ट्र धर्म नाही."

"कोरोना काळात केलेलं काम पुसून टाकायला पाहत आहेत. तुमच्या भाजपाशासित राज्यांच्या तुलनेत माझ्या महाराष्ट्रातील काम बघा आणि तिथे जर का मी मागे पडलो ना तर मी पुन्हा कधी कोणाला तोंड नाही दाखवणार. मांडा हिशोब. हे आपल्याला लूटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती स्वराज्यासाठी... हे दोन ठग माझा महाराष्ट्र लूटत आहेत. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लूटत आहेत. तोच लुटीचा पैसा वापरून जाहिराती करत आहेत."

"सरकारी जाहिरातीवर लोकांचा विश्वास आहे. २०१४ साली केलेलं... चाय पे चर्चा. तेव्हा चहा कितीला मिळायचा आणि आता कितीला मिळतो, दूध किती महागलं, साखर किती महागली, जीएसटी किती लागला यावर चर्चा करा. गावामध्ये योजना किती आणल्या आणि लाभ किती झाला याचा आढावा घ्या. मुलगी शिकली प्रगती झाली आणि १५०० देऊन घरी बसवली" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस