शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राम सत्यवचनी, अयोध्येतून सत्याचा बोध घेऊन यावे; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 11:42 IST

अयोध्येत जाण्याचा मार्ग आम्हीच दाखवला. मुख्यमंत्री कायदेशीर आहे की नाही हे लवकरच सर्वोच्च न्यायालय ठरवेल असं संजय राऊत यांनी सांगितले.

मुंबई - अयोध्येत कुणी जावं की नाही यावर बंधन असू शकत नाही. अयोध्या तीर्थक्षेत्र आहे कुणीही जावे. परंतु तिथून येताना सत्याचा बोध घेऊन यावे असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांना लगावला आहे. शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी व्हावा यासाठी भाजपानेही विशेष प्रयत्न केले आहेत. 

या दौऱ्याबद्दल खासदार संजय राऊत म्हणाले की, राम सत्यवचनी आणि सत्याचे प्रतिक आहे. तिथे कुणी बेईमान जात असेल तर त्याला रामाचे आशीर्वाद मिळणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या आमदारांना अयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवला. त्या रस्त्याने भरकटू नका. प्रभू श्री राम सगळ्यांचे आहेत. रामाच्या चरणी जाऊन महाराष्ट्रात केलेले पाप धुवायचे असेल तर प्रभू राम आशीर्वाद देत नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मी गेले ४० वर्ष अयोध्येत जातो. शिवसेनेत अयोध्येत जावं ही माझी भूमिका मी उद्धव ठाकरेंना सांगितली. त्यानंतर ते सातत्याने ते अयोध्येत जातात. मुख्यमंत्री असताना, नसतानाही गेले. हजारो शिवसैनिकांना आम्ही आमंत्रण दिले होते त्यात एकनाथ शिंदेही होते असं संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, इतकी वर्ष भाजपा नेत्यांना अयोध्येत जावं वाटले नाही. आता इच्छा असेल तर जावे. अयोध्येत जाण्याचा मार्ग आम्हीच दाखवला. मुख्यमंत्री कायदेशीर आहे की नाही हे लवकरच सर्वोच्च न्यायालय ठरवेल. खोके असल्यावर काहीही करता येते. रामाचा, शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे नाते आहे ते कायम राहील असंही राऊतांनी सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा चर्चेतनिवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयानंतर श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाणार असून, ही महापूजा केलेला धनुष्यबाण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तालुक्यात फिरविण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री अयोध्या येथे प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री शिंदे अयोध्येत रामाचे दर्शन घेतील. संध्याकाळी शरयू नदीवर आरती होईल. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन ते पुन्हा मुंबईसाठी रवाना होतील. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेAyodhyaअयोध्या