शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 05:57 IST

हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांची साथ सोडली तर काय होते हे दिल्लीतील बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत सेनेने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी प्रतीकात्मक आंदोलन केले.  

मुंबई : उद्धव ठाकरे हे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे भाजपसोबत होते तेव्हा त्यांना मान होता, पण त्यांनी हिंदुत्व सोडले, आता त्यांच्या पदरात अपमानाची शेवटची रांग आली, अशी टीका भाजपने केली. तर काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी स्क्रीनच्या प्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होत असल्याने आम्ही मागे गेलो, असा खुलासा केला आहे.    हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांची साथ सोडली तर काय होते हे दिल्लीतील बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत सेनेने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी प्रतीकात्मक आंदोलन केले.  

उद्धव ठाकरे दिल्लीसमोर झुकणार नाही वगैरे म्हणतात, प्रत्यक्षात तिथे त्यांना काय वागणूक मिळाली ते दिसते. आमच्याकडे ते होते त्या वेळी पहिल्या रांगेत असायचे. आता तिथे काय मान मिळतो ते दिसले आहे.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

एखाद्याचा अपमान झाला तरी त्याला काहीही वाटत नसेल, तर मी काय प्रतिक्रिया देणार? जे स्वाभिमान गहाण ठेवत आहेत आणि बाळासाहेबांचे विचार विकत आहेत, त्यांना काहीच वाटणार नाही, उलट त्यांनाच विचारले पाहिजे, तुम्हाला इतक्या मागे का बसवले होते?एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री 

...म्हणून आम्हीच मागे बसलो : संजय राऊतउद्धव ठाकरे यांना पुढेच बसवले होते, परंतु सादरीकरणासाठी लावलेल्या स्क्रीनच्या प्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होत असल्याने उद्धव ठाकरे, आदित्य आणि मी मागे बसण्याचा निर्णय घेतला, असे खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस