शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

“अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा,” रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 07:40 IST

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राज्यातील १८ लोकसभा मतदार संघांसाठी भाजपने मिशन सुरू केले आहे. नड्डा यांची सोमवारी आधी चंद्रपुरात सभा पार पडली. त्यानंतर त्यांची औरंगाबादमध्येही सभा झाली. परंतु त्यांच्या औरंगाबादमधील सभेत अनेक खुर्चा रिकाम्या असल्याचा दावा ठाकरे गटाच्या आमदाराकडून करण्यात आला असून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच त्यांनी व्हिडीओ शेअर करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्यावर टीकेचा बाण सोडलाय. “अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा..” असं ट्वीट त्यांनी केलंय.

“अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा…लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे,” असं ट्वीट अंबादास दानवे यांनी केलंय.

काय म्हणाले होते नड्डा?“जग जेव्हा संकटातून जात आहे, प्रत्येक देश या संकटातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. मंदीच्या दिवसातही भारत ब्रिटनला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर गेला आहे. या मंदीच्या दिवसातही भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. आज अमेरिका आणि रशिया संकटातून जात आहेत, पण, भारत अर्थव्यवस्था स्थीर करण्याचा प्रय़त्न करत आहे. आज आपण स्टीलमध्ये जगात दोन नंबरला आहे. आपल्या देशात ५७ टक्के मोबाईल बनवले जातात, असंही जे.पी.नड्डा म्हणाले. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाAmbadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना