शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेना-मनसेच ठरलं...; 'या' पालिकेत निवडणूक एकत्र लढवण्याची केली संयुक्त घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 18:11 IST

राजकीय समीकरणे बदलणार?

सातारा : एकीकडे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या सातारा पालिकेसाठी उद्धवसेना व मनसेने संयुक्त बैठक घेत पालिका निवडणूक लढवण्याची घोषणा करून टाकली. या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ऐन दिवाळीत घेतलेल्या या निर्णयामुळे आता येत्या काही दिवसांत राजकीय फटाके फुटणार असल्याचे निश्चित झाले आहे.साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा गुरुवारी केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही युती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, अशी माहिती मनसेचे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे आणि शहर संघटक प्रणव सावंत यांनी दिली.सातारा शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि अडचणींवर शिवसेना-मनसेकडून नेहमीच आवाज उठवला जात आहे. याच जनहिताच्या उद्देशाने दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले. सातारकर नागरिक कायम आमच्या पाठीशी राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी श्रीकांत पवार, भरत रावळ, गणेश अहिवळे, रविराज बडदरे, रोहित जाधव, सुमित नाईक, शिवाजीराव इंगवले, प्रशांत सोडमिसे, संदीप धुढळे, ओंकार साळुंखे, मनोहर चव्हाण, इम्रान शेख, नयन साळुंखे, प्रदीप सावखंडे, आशुतोष पारंगे, ओमकार शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राजकीय समीकरणे बदलणार?येत्या काळात सातारा नगरपालिकेची निवडणूक होत आहे. सध्या या निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील दोन आघाड्या सक्रिय आहेत. त्यातच आता उद्धवसेना आणि मनसेमुळे निवडणुकीच्या मैदानात आणखी एका प्रबळ शक्तीचा प्रवेश झाला आहे. या नव्या युतीमुळे साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. आगामी काळात ही लढत तिरंगी होणार की चौरंगी? या नव्या युतीचा सत्तेच्या समीकरणांवर कसा व कितपत परिणाम होताे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena and MNS to jointly contest Satara municipal elections.

Web Summary : Uddhav Sena and MNS announced a joint alliance to contest the upcoming Satara municipal elections. This decision, made amidst discussions of reconciliation between Thackeray brothers, introduces a new dynamic, potentially reshaping Satara's political landscape and power equations.