Shiv Sena Shinde Group News: लोकसभेपासून ते महानगरपालिका निवडणुकांपर्यंत सर्व निवडणुका झाल्या असल्या तरी ठाकरे गटाला एकमागून एक बसत असलेले धक्के अद्यापही सुरूच आहेत. उद्धवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. दिल्ली दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री राज्यात परत येताच उद्धवसेनेला मोठा धक्का दिला आहे. उद्धवसेनेचे ४ नगरसेवक शिंदे गटात आले आहेत.
अकोल्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या घडामोडी समोर आल्या आहेत. महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठी राजकीय खेळी केली आहे. अकोल्यात उद्धवसेनेला मोठा धक्का बसला असून, निवडून आलेल्या ६ नगरसेवकांपैकी तब्बल ४ नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी एक्सवर एक पोस्ट करत माहिती दिली.
शिंदे दिल्लीतून परतले, ठाकरेंचे ४ नगरसेवक पक्षात घेतले
उद्धवसेनेचे अकोला जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांच्यासह अकोला महानगरपालिकेतील उद्धवसेनेचे नगरसेवक मनोज पाटील, सागर भरूका, सोनाली सरोदे, सुरेखा काळे यांनी हाती भगवा घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे अकोल्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, ठाकरेंचे आता केवळ २ नगरसेवक उरले आहेत. ६ नगरसेवकातील ४ नगरसेवक शिंदे गटात गेल्याने उद्धवसेनेला मोठा झटका बसला आहे. आता दोन नगरसेवक तरी उद्धव सेनेत राहतील का, की तेही त्यांचा मार्ग निवडतील, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Web Summary : Uddhav Thackeray's faction suffers setback as four corporators from Akola defect to Eknath Shinde's Shiv Sena after Shinde's Delhi visit. Only two corporators remain with Thackeray's group, causing political upheaval in Akola.
Web Summary : उद्धव ठाकरे गुट को झटका, अकोला के चार पार्षद शिंदे की शिवसेना में शामिल हुए। शिंदे की दिल्ली यात्रा के बाद यह घटना हुई। ठाकरे गुट में अब केवल दो पार्षद बचे हैं, जिससे अकोला में राजनीतिक उथल-पुथल मची है।