शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"मस्तवाल वागणाऱ्या खासदाराला जाब विचारणारं भाजपात कोणीच नाही", अंबादास दानवेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 13:20 IST

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या ब्रीजभूषण यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर देशातील नामांकित महिला पैलवानांनी लैगिंक छळाचा आरोप केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात ब्रीजभूषण यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचे म्हटले आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापल्याचे दिसते. आरोपांमध्ये तथ्य असतानाही भाजपा खासदारावर कारवाई का होत नाही असा प्रश्न विरोधक करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील ब्रीजभूषण यांच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले. 

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार सिंह यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. "एका तक्रारदाराने अशा सहा ठिकाणांचा उल्लेख केला आहे, जिथे ब्रिजभूषण यांनी तिचा विनयभंग केल्याचे सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंतच्या तपासानुसार, ब्रिजभूषण सिंह हे लैंगिक छळ, विनयभंग या गुन्ह्यांसाठी कायदेशीर कारवाईसाठी पात्र आहेत", असे दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.

अंबादास दानवेंची बोचरी टीका अंबादान दानवेंनी भाजपावर टीका करताना एक व्हिडीओ शेअर करत म्हटले, "खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांचा हा खालील व्हिडीओ पाहून अनिल कपूरच्या 'नायक' सिनेमातील अंबरीश पुरी यांची आठवण झाली. मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ढोल वाजवणाऱ्या भाजपामध्ये कणखर भूमिका घेणारी, नितीमत्ता शिल्लक असलेली एकही व्यक्ती नाही, जी अश्या मस्तवाल वागणाऱ्या स्वपक्षीय खासदाराला जाब विचारेल. बरोबर, सरकारं बनवण्यात, पाडण्यात मती गुंग असेल तर असे ब्रिजभूषण कसे दिसतील. बाकी 'नारी के सन्मान मे...' हा नारा भाजप शासित नसलेल्या राज्यात चुना लावून ठोकायला मात्र हे मोकळे आहेत."

२३ एप्रिलपासून जवळपास दीड महिने पैलवानांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाला देशातील विविध संघटनांसह राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पैलवानांनी आखाड्याबाहेरील कुस्ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहdelhiदिल्लीsexual harassmentलैंगिक छळBJPभाजपा