शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे-शिवेंद्रराजे यांच्यात धुमश्चक्री, ‘सुरुचि’वर हवेत गोळीबार, ३०० जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 05:02 IST

सातारा : आनेवाडी टोलनाक्यावर झालेल्या राड्याचे रुपांतर शुक्रवारी मध्यरात्री एकमेकांवर बंदूक रोखण्यापासून हवेत गोळीबारापर्यंत गेले. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुरुचि बंगल्यावर रात्री साडेबारा वाजता खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. त्यातच काही संतप्त कार्यकर्त्यांनी बंदुकीतून हवेत आठ राऊंड फायर केल्याने गोंधळ आणखीच उडाला. दगडफेकीत अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. ...

सातारा : आनेवाडी टोलनाक्यावर झालेल्या राड्याचे रुपांतर शुक्रवारी मध्यरात्री एकमेकांवर बंदूक रोखण्यापासून हवेत गोळीबारापर्यंत गेले. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुरुचि बंगल्यावर रात्री साडेबारा वाजता खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. त्यातच काही संतप्त कार्यकर्त्यांनी बंदुकीतून हवेत आठ राऊंड फायर केल्याने गोंधळ आणखीच उडाला. दगडफेकीत अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह तिघेजण जखमी झाले. याप्रकरणी उदयनराजे तसेच शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह तीनशे कार्यकर्त्यांवर मारामारी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.आनेवाडी टोलनाका हस्तांतरण करण्याच्या मुद्द्यावरून या दोन राजेंमध्ये चांगलीच जुंपली आहे. ज्या नवीन कंपनीकडे हा ठेका जाणार आहे ते सर्व शिवेंद्रसिंहराजेंना मानणारे असल्याने त्यांच्यामुळेच हस्तांतरण होत असल्याची भावना उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यातच उदयनराजेंनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह या नाक्यावर आपल्या खास स्टाईलने एंट्री मारुन चार तास वाहनांना टोल फ्री वाट करुन दिली. रात्री बाराच्या सुमारास हस्तांतरणाची प्रक्रिया होणार होती. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे नाक्यावर येतील असा कयास होता. परंतु, पोलिसांनी समजूत काढल्याने शिवेंद्रसिंहराजे आनेवाडी टोलनाक्यावर गेले नाहीत.त्यानंतर मध्यरात्री साडेबाराला उदयनराजे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट शिवेंद्रसिंहराजेंचा सुरुचि बंगला गाठला. शाहूपुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे बंगल्याच्या गेटवर उभे होते. उदयनराजे दोनशे कार्यकर्त्यांसमवेत शिवेंद्रसिंहराजेंच्या बंगल्यात शिरले. धुमाळ यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उदयनराजेंनी त्यांना धक्का देऊन बाजूला सारले. याचवेळी शिवेंद्रसिंहराजेंचेही कार्यकर्ते तेथे आले. दोन्ही राजेंचे कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुक्की करू लागल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. या गोंधळताच एकाने बंदुकीतून दोन गोळ्या हवेत झाडल्या. मोठा आवाज झाल्याने कार्यकर्ते पळू लागले. त्यानंतर काही वेळातच आणखी फाटऽऽफाट असा आवाज आला. सहा राऊंड हवेत फायर झाले. हा प्रसंग ओळखून पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगविल्याने अनर्थ टळला.

टॅग्स :Policeपोलिस