"मी माझ्या पीए नेताजीला उमेदवारी देणार नव्हतो, पण पहाटे ३ वाजता एका कार्यकर्त्याचा मेसेज आला आणि अख्खं समीकरण बदललं," अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या पीएच्या विजयामागचे गुपित उघड केले आहे. मंत्री उदय सामंत यांच्या पीएने जिल्हा परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असून, त्यांच्या या विजयाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी सामंत यांचा पीए यांना तिकीट देण्यासाठी कार्यकर्ते आग्रही होते. मात्र, सुरुवातीला उदय सामंत त्याला उमेदवारी देण्याच्या विचारात नव्हते. सामंत म्हणाले, "कार्यकर्त्यांनी माझ्याकडे उमेदवारी मागितली होती, पण मी खूप विचार करत होतो. नेताजीने माझ्यासोबत २० वर्षे काम केले आहे. म्हणून मी त्याला उमेदवारी दिली नाही. एके रात्री पहाटे ३ वाजता मला एका सामान्य कार्यकर्त्याचा मेसेज आला. त्या मेसेजमध्ये लिहिले होते की, आपल्याला जिल्हा परिषदेत नेताजी हवा आहे, समोरचा जो आहे तो मोठ्या अविर्भावात वावरत असतो. तर तिथे जमिनीवर काम करणारा आणि लोकांचे प्रश्न सोडवणारा नेता हवा आहे आणि तो या कामासाठी योग्य आहे."
पीए म्हणून नाही, तर कामाची पोचपावतीकार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि नेताजीने गेल्या काही वर्षांत मतदारसंघात ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष वाढवला, ते पाहून सामंत यांनी अखेर त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. "मी त्याला उमेदवारी माझा पीए म्हणून दिली नाही, तर त्याने संघटनेसाठी केलेल्या कामाची ती पोचपावती होती. त्याने पक्ष वाढविला आणि लोकांशी संपर्क ठेवला, म्हणूनच आज मतदारांनी त्याला विजयी केले आहे. पैसेवाल्याचाच मुलगा उमेदवार असावा असे काही नाही," असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
राजकीय वर्तुळात चर्चामंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यावर अनेकदा घराणेशाही किंवा वशिल्याची टीका होते. मात्र, सामंत यांनी हा 'पहाटे ३' चा किस्सा सांगून ही उमेदवारी केवळ जनमताचा कौल पाहूनच दिल्याचे सिद्ध केले आहे. या विजयामुळे सामंत यांची मतदारसंघावरील पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Web Summary : Minister Uday Samant revealed his PA's victory secret: a 3 AM message from a worker changed everything. Samant initially hesitated but was convinced after the message highlighted the PA's grassroots work and accessibility, leading to a resounding win.
Web Summary : मंत्री उदय सामंत ने बताया, एक कार्यकर्ता के सुबह 3 बजे के मैसेज ने उनके पीए को जिला परिषद सदस्य बना दिया। शुरू में हिचकिचाए सामंत को संदेश ने पीए के जमीनी काम और पहुंच के बारे में आश्वस्त किया, जिससे शानदार जीत हुई।