शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"वैभव नाईकांना पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला उदय सामंतांनी ५० लाख रुपये दिले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 15:58 IST

शिवसेना फोडण्याचं घाणेरडे काम उदय सामंत यांच्याकडून केलं जात आहे. आमच्याकडे या, पैसे घेऊन जा असे फोन पदाधिकाऱ्यांना केले जात आहेत असा आरोप राऊतांनी केले.

रत्नागिरी - सिंधुदुर्गात शिवसेना आमदार वैभव नाईक यांना पाडण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला ५० लाख रुपये देत स्वत:च्या पक्षातील उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे आणि त्यांच्या लोकांना पोसण्याचं काम उदय सामंतांनी केले. आईबापाची शपथ घेऊन सांगावं नाही केले असा इशाराच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सामंतांना देत गंभीर आरोप केले आहे. वैभव नाईक, उदय सामंत हे शिवसेना आमदार आहेत तर विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. सध्या उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेत. 

विनायक राऊत म्हणाले की, शिवसेना फोडण्याचं घाणेरडे काम उदय सामंत यांच्याकडून केलं जात आहे. आमच्याकडे या, पैसे घेऊन जा असे फोन पदाधिकाऱ्यांना केले जात आहेत. राणे आणि त्यांना माणसांना पोसण्याचं काम त्याने केले. वैभव नाईक स्वत:च्या पक्षाचे असतानाही विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभे राहणाऱ्याला आर्थिक मदत करण्याचं काम उदय सामंत यांनी केले. ५० लाख रुपये विरोधी उमेदवाराला दिले असा गंभीर आरोप उदय सामंतावर केला.  

तर विनायक राऊत हे अध्यात्मिक व्यक्ती आहेत. ते खरे असतील कुणी माझ्याकडून पैसे घेतले. कुणी किती पैसे घेतले हे सांगावं. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. ते वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत. विनायक राऊत हे देशाचे नेते आहेत. काळ आणि नियती राऊतांना उत्तर देईल असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी राऊतांना दिले आहे. 

विनायक राऊतांचा सातत्याने हल्लाबोलभाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर चुकत असेल, तर आपल्याला जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपाने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असं आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले होते. त्यावर अख्ख्या देशाला लांच्छनास्पद ठरेल असे राजकारण भाजप पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडले. दुर्देवाने शिवसेनेचे ४० आमदार त्याला बळी पडले. सत्तेची लालसा व मुख्यमंत्रीपदाचा हव्यास त्याला कारणीभूत ठरला, अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती. 

तसेच विनायत राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर देखील निशाणा साधला होता. उदय सामंत किंवा दीपक केसरकर यांचा आयत्या बिळात नागोबाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश झालेला होता. त्यांच्यामुळं शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेनं त्यांना वाढवलेलं असल्याचं, विनायक राऊत यांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Uday Samantउदय सामंतVinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेना