शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

दोन वर्षांनंतरही अडथळे कायम

By admin | Updated: October 31, 2016 06:54 IST

सिनेमाच्या दर्जानुसार समीक्षक त्याला स्टार देतात. देवेंद्र फडणवीस सरकारला पाचपैकी किती स्टार द्यायचे असा प्रश्न आला तर तीन स्टार द्यावे लागतील.

यदु जोशी,

मुंबई- सिनेमाच्या दर्जानुसार समीक्षक त्याला स्टार देतात. देवेंद्र फडणवीस सरकारला पाचपैकी किती स्टार द्यायचे असा प्रश्न आला तर तीन स्टार द्यावे लागतील. कधी पक्षातून, कधी मित्रपक्ष शिवसेनेकडून उभी झालेली आव्हाने, काही मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अशी अडथळ्यांची शर्यंत पार करीत असलेल्या या सरकारसमोर आव्हाने कायमच आहेत. सरकारचे नवलाईचे नऊ दिवस केव्हाच संपले असून आता पुढील काळ हा स्वत:ला सिद्ध करण्याचा असेल. ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे अल्पमतातील सरकार सत्तारुढ झाले आणि डिसेंबरमध्ये शिवसेना हा जुना मित्र पक्ष लहान भावाची भूमिका स्वीकारत या सरकारमध्ये सहभागी झाला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून दरदिवशी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका होत असली तरी त्या तणावाचा परिणाम मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या स्थैर्यावर होऊ दिलेला नाही. मातोश्रीशी त्यांची असलेली हॉटलाइन (उद्धव यांच्याशी व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध) त्यांच्या कामास येत आहे. फडणवीस हे या सरकारचा एकखांबी तंबू असल्याचे चित्र दोन वर्षांनंतरही कायम आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचे भक्कम पाठबळ असल्याने निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. त्यामुळेच वर्षानुवर्षे रेंगाळलेले अनेक विषय ते मार्गी लावत आहेत. दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्राच्या प्रकल्पांना गती मिळाली. दिल्लीतील महाराष्ट्राच्या सर्वच मंत्र्यांचे योगदान फडणवीस सरकारसाठी सहाय्यभूत ठरले. इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाच्या मार्गातील अडथळे दूर झाले. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभाराची हमी सुरुवातीलाच दिली होती. गेल्या दोन वर्षांत त्यांनी स्वत:ची स्वच्छ प्रतिमा अधिक उजळ केली पण सरकार आणि प्रशासन पूर्णत: पारदर्शक झाले असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. केवळ मुख्यमंत्री पास होतील आणि सरकार नापास होणार असेल तर त्याचे अपश्रेय मुख्यमंत्र्यांकडेच जाईल. मराठा आणि इतर समाजांच्या विराट मोर्चांनी राज्य अक्षरश: ढवळून निघाले आहे. मोर्चेकऱ्यांनी आता चेंडू सरकारच्या कोर्टात टाकला आहे. मुख्यमंत्री फडणवीस सर्वांचे समाधान कसे करतात या बाबत उत्सुकता आहे. >तिसरे वर्ष आव्हानाचे : मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणार असून, ती या सरकारचे भवितव्य ठरविणारी असेल. युती झाली तर सरकार टिकेल, अन्यथा सेना काय निर्णय घेते व मुख्यमंत्री त्या वेळची परिस्थिती कशी हाताळतात, हे महत्त्वाचे असेल. नजीकच्या काळात नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि राज्यातील अन्य महापालिकांच्या निवडणुकांतही नेतृत्वाचा कस लागेल. >डोकेदुखीज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून द्यावा लागलेला राजीनामा.दहा मंत्र्यांवर विरोधकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप.मंत्र्यांमध्ये संवादाचा अभाव अन् मित्रपक्ष शिवसेनेचेच विरोधकांसारखे वागणे.मुख्यमंत्र्यांच्या वेगाशी मॅच न करू शकणारी टीम. अनुभवाची कमतरता.सेवा हमी कायद्यापासून अनेक चांगले निर्णय, पण त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीकडे मात्र म्हणावे तेवढे लक्ष नाही.>सरकारची उपलब्धीमेक इन इंडियामध्ये महाराष्ट्रात झालेली मोठी गुंतवणूकजलयुक्त शिवार योजनेतून गावागावात रचल्या जल यशगाथा.मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन वे या समृद्धीच्या महामार्गाची घोषणा. मेट्रोसह मुंबईतील पायाभूत सुविधांना गती. दहावी, बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची परीक्षा एक महिन्याच्या आत घेण्याच्या निर्णयाने वाचले हजारो विद्यार्थ्यांचे वर्ष. राज्यातील २५ हजार शाळा झाल्या डिजिटल.विकासाचे विदर्भ, मराठवाड्यात विकेंद्रीकरण करण्याची आश्वासक सुरुवात.