शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

दुचाकी घसरल्याने ट्रेलरखाली चिरडून मृत्यू , तारा गावाजवळ अपघातात महिला ठार : मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:30 IST

मुंबई-गोवा महामार्गावर तारा गावानजीक रस्त्यावरील पडलेल्या खडीमुळे मोटारसायकल घसरून एक महिला रस्त्यावर पडली.

मोहोपाडा / पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावर तारा गावानजीक रस्त्यावरील पडलेल्या खडीमुळे मोटारसायकल घसरून एक महिला रस्त्यावर पडली. मात्र, मागून आलेल्या ट्रेलरखाली चिरडली गेल्याने तिचा मृत्यूू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडला. या वेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ केल्याने, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.ठाणे येथे राहणाºया भाग्यश्री शिंदे पेण तालुक्यात नातेवाईकांकडे आल्या होत्या. सकाळी ठाण्याला मोटारसायकलने जाण्यासाठी निघाल्या. तारा गावानजीक आल्यावर रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे त्यांची मोटारसायकल घसरली. त्या वेळी पाठीमागून येणाºया ट्रेलरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ केला. अपघात झाल्यानंतर ट्रेलरचालक पळून गेला. त्याला पकडण्यासाठी नागरिकांनी ‘रास्ता रोको’ केला होता. पोलिसांनी ट्रेलर चालकाला पकडल्यानंतर ‘रास्ता रोको’ आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनामुळे झाल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होती.पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या पळस्पे ते इंदापूरदरम्यान पहिल्या टप्प्याचे काम २००७ पासून सुरू आहे. दहा वर्षे उलटूनदेखील हे काम अद्याप पूर्ण न झाल्याने, ग्रामस्थ संतप्त आहेत. त्यामुळे हे कितपत सहन करायचे? अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिली. रुंदीकरणाचे काम कारणाºया कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या वेळी ठाकूर यांनी केली.खड्ड्यांमुळे अपघात-मुंबई-गोवा रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडल्याने, या रस्त्यावरून वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात खड्डे पाण्याने भरल्याने, वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अधिक अपघात होतात. या रस्त्यालगत टाकलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी या रस्त्याचे कायमस्वरूपी काम करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात