शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह; शरद पवार यांचं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 09:32 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

कोल्हापूर-

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. निवडणुकांबाबत आमच्या पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

"निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना वाटतंय की निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढावी. तर काही जणांनी एकट्यानं निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. यावर पक्षात सविस्तर चर्चा होऊन येत्या काळात निर्णय घेतला जाईल", असं शरद पवार म्हणाले. तसंच कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घ्या असे आदेश दिलेले नाहीत, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

"सुप्रीम कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घ्या असं म्हटलेलं नाही. निवडणूक तयारीची प्रक्रिया १५ दिवसांत सुरू करा असं कोर्टानं सांगितलं आहे", असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. देशपातळीवर मोदींना सक्षम पर्याय देण्यात अद्याप विरोधी पक्षांना यश येत नसल्याच्या प्रश्नावर बोलत असताना शरद पवार यांनी विरोधी पक्षांमधील अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवलं. "मोदींना सक्षम पर्याय देण्यासंदर्भात काँग्रेससह सर्व पक्षांनी याचा अंतर्गत निर्णय घेणं महत्वाचं आहे", असं शरद पवार म्हणाले. 

राज ठाकरेंना टोलामनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असून यावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये टीका सुरू झाली आहे असं शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी एका वाक्यात यावर उत्तर देत राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही, एवढं बोलून शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला टोला लगावला. "अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. वाढती महागाई, बेरोजगारी आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती हे खरे देशाला भेडसावणारे प्रश्न आहेत. अयोध्या दौरा काय माझा नातूही काल मी पाहिलं तर अयोध्येला गेलाय. त्यात काही विशेष असं नाही", असं शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस