शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन बहिणीसह भावाचा तलावात बुडून मृत्यू, कमळाचे फुल तोडण्याकरिता उतरले होते तलावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 21:15 IST

गावाशेजारील तलावात कमळाचे फुल व कळया तोडण्याकरिता तलावात शिरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून करूण अंत झाला.

भंडारा : गावाशेजारील तलावात कमळाचे फुल व कळया तोडण्याकरिता तलावात शिरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून करूण अंत झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल गाव असलेल्या सुंदरटोला येथे घडली. मुस्कान धनराज सरीयाम (९), प्रणय धनराज सरीयाम (१०)  व सारिका छबीलाल सरीयाम (११) अशी या मृत पावलेल्या बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.सुंदरटोला येथील रहिवासी असलेली ही तिघेही भाऊ-बहीण गावाजवळील तलावात कमळाचे फुल व कळी (डोडे) तोडण्याकरिता पाण्यात उतरले.  तत्पूर्वी त्यांनी कपडे ओले होऊ नये म्हणून, तलावाच्या पाळीवर कपडे काढून ठेवले होते. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. तलावाच्या काठावर कपडे दिसल्याने इतरांना शंका उत्पन्न झाली. काहींना तिघेही भाऊ-बहिण तलावाच्या दिशेने काही वेळापूर्वी जाताना बघितले होते. ही वार्ता गावात वाºयासारखी पसरली. तलावात शोधाशोध सुरु होती. रात्र झाल्याने त्यात अडचणी निर्माण होत्या. दरम्यान ८ वाजताच्या सुमारास तिघांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबियाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी चिखला येथील सरपंच दिलीप सोनवाने, माजी जि.प. सदस्य अशोक उईके, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, माजी पं.स. सदस्य प्रभा पेंदाम व अनिल टेकाम यांनी केली आहे.