शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

ट्रकच्या धडकेत मुंबईच्या दोन पोलिसांचा मृत्यू

By admin | Updated: May 7, 2015 03:20 IST

नादुरुस्त इनोव्हाला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुंबईतील सीआयडीचे दोन कर्मचारी जागीच ठार, तर तीन जखमी झाले.

कोल्हापूर : नादुरुस्त इनोव्हाला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुंबईतील सीआयडीचे दोन कर्मचारी जागीच ठार, तर तीन जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथे ओढ्याच्या पुलाजवळ घडला. हे सर्वजण कोल्हापूर येथे अधिकाऱ्याच्या घरातील विवाहानिमित्त जात होते़ राजू बाबू सोनवणे (४८,), अब्दुल रशीद महमंद शेख (४२) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये चालक संदीप रावजी घोडे (४०, रा. चेंबूर, मुंबई), बिरुदेव बाबासो शिंदे (४७, रा. नवी मुंबई), रवींद्र विनायक केळकर (४७, रा. घाटकोपर-मुंबई) यांचा समावेश आहे़ त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर पेठवडगाव पोलिसांनी त्यांना मुंबईकडे पाठविले.मुंबईतील गुन्हे अन्वेषण परिमंडळ ६ (सीआयडी)चे सात कर्मचारी कोल्हापूर येथे लग्नकार्यासाठी इन्होवाने मंगळवारी रात्री दहा वाजता कोल्हापूरकडे निघाले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. यात शेख आणि सोनावणे ठार झाले तर दुरुस्तीचे काम करणारे शिंदे, केळकर व घोडे हे बाजूला फेकले गेले. सुदैवाने रघुनाथ साताप्पा पाटील (पोलीस निरीक्षक) व मनोहर भंडारी (सहायक पोलीस निरीक्षक) बचावले. घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव पोलीस व महामार्ग मदत केंद्राच्या पथकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. दुपारी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सोनवणे व शेख यांचे मृतदेह मुंबईला पाठविण्यात आले. (प्रतिनिधी) असा घडला अपघात...घुणकी गावाजवळ कारमध्ये बिघाड झाल्याने ती रस्त्याच्या कडेला उभी केली होती. दरम्यान, बुधवारी सकाळी मुंबईहून कर्नाटककडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली़ त्यामुळे कार पंधरा फूट फरफटत जाऊन बाजूच्या नाल्यात पंचवीस फूट खोल खड्ड्यात पडली. यात अब्दुल रशीद महमंद शेख व राजू बाबू सोनवणे हे जागीच ठार झाले,