सिंधुदुर्गनगरी : बांदा सटमटवाडी येथे माकडतापाच्या साथीने मृत्युमुखी पडलेल्या सात रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाणार आहे. लवकरच नातेवाईकांकडे धनादेश सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यंदा माकडतापाने आतापर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे ८० रुग्ण या साथीने बाधित आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुरुवातीला सात रुग्णांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. ते सर्व राज्य शासनाने मंजूर केले असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
माकडताप बळींच्या नातेवाईकांना दोन लाख
By admin | Updated: April 12, 2017 01:16 IST