मुंबई : देशहितापेक्षा एका कुटुंबाला महत्त्व देणाऱ्या काँग्रेस पक्षाने वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) कायद्याचे विधेयक संसदेत रोखून देशाचे २ लाख कोटी रुपयांचे तर महाराष्ट्राचे २० हजार कोटींचे नुकसान केले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रपरिषदेत केली.जीएसटीचा कायदा झाला असता तर त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले असते; काँग्रेसला तेच नको होते म्हणून संसदेत गोंधळ घालण्याची भूमिका त्या पक्षाने घेतली. भाजपा विरोधात असताना गदारोळ व्हायचा पण देशहिताची विधेयके मंजूर करण्यासाठी सरकारला सहकार्याचीही भूमिका घेतली जायची. जीएसटीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था रुळावर येणार असताना काँग्रेसने मात्र, गोंधळ करून संसद बंद पाडण्याची संकुचित वृत्ती दाखविली,असेही मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)बँका कोणी बुडविल्या ?उस्मानाबादची जिल्हा बँक कोणी बुडविली, मराठवाड्याचे हक्काचे पाणी कृष्णा खोऱ्यात कोणी पळविले, साखर कारखाने, दूध सूतगिरण्या कोणी खाल्ल्या याचे आधी उत्तर द्या, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. उद्या राज्यभर निदर्शनेजीएसटीला विरोध करण्यासाठी संसदेचे कामकाज काँग्रेसने बंद पाडले हे जनतेसमोर आणण्यासाठी सोमवारी (दि.१६) भाजपाचे कार्यकर्ते राज्यभर काँग्रेसविरुद्ध निदर्शने करतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली.
काँग्रेसमुळे दोन लाख कोटींचे नुकसान
By admin | Updated: August 15, 2015 00:30 IST