खारघरमध्ये अपघातामध्ये दोन ठार

By Admin | Updated: June 3, 2014 22:29 IST2014-06-03T21:19:05+5:302014-06-03T22:29:57+5:30

मुंबई-पुणे महामार्गावर खारघरमध्ये इंडिका कार समोरील टेम्पोवर धडकली. या अपघातात दोन जण ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.

Two killed in accident at Kharghar | खारघरमध्ये अपघातामध्ये दोन ठार

खारघरमध्ये अपघातामध्ये दोन ठार

नवी मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर खारघरमध्ये इंडिका कार समोरील टेम्पोवर धडकली. या अपघातात दोन जण ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. महामार्गावर जी. डी. पोळ महाविद्यालयासमोर पहाटे ६ च्या सुमारास हा अपघात झाला. ठाणेवरून पुणेच्या दिशेने जाणार्‍या इंडिका कारने (एमएच-०४ जे.डी. १४०८) समोरील टेम्पोला (एमएच ०६ जी. ५२८२) जोरदार धडक दिली. अपघातामध्ये अजय आत्माराम सूर्यवंशी व जयवंत गंगाराम सूर्यवंशी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये तानाजी तात्याबा पवार, सविता गुरव व आकाश पवार हे तीनजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची नोंद खारघर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. मृत्यू झालेले दोघेही ठाणेमधील वागळे इस्टेट येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 

Web Title: Two killed in accident at Kharghar