कांजूरमार्गमधील आगीतून सुदैवानं बचावले दोनशे कर्मचारी
By Admin | Updated: July 31, 2016 07:24 IST2016-07-31T01:11:12+5:302016-07-31T07:24:54+5:30
कांजूरमार्ग येथील क्रॉम्पटन ग्रीव्हस (सीजी) कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

कांजूरमार्गमधील आगीतून सुदैवानं बचावले दोनशे कर्मचारी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - कांजूरमार्ग येथील क्रॉम्पटन ग्रीव्हस् (सीजी) कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग लागली तेव्हा दोनशे कर्मचारी रात्रपाळीसाठी आत होते. सुदैवाने अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी टळली.
या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बनविण्याचे काम सुरू आहे. जवळपास चारशे ते पाचशे एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचा समावेश आहे. तळ मजल्यावरील प्लानिंग आणि फायनान्स विभाग आणि एचआर विभागासहित पहिल्या मजल्यावरील डिझाईन आणि मार्केटिंग विभाग जळून ख़ाक झाल्याचे समजते. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. मात्र या घटनेने कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.