शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

दोनशे टक्के अधिक दरापोटी कोट्यवधीची खिरापत!

By admin | Updated: April 12, 2017 00:28 IST

पोषण आहार : सहकार मंत्र्यांकडून पणन संचालकांच्या आदेशाला स्थगिती

अकोला : शालेय पोषण आहार पुरवठ्याची कामे महाराष्ट्र स्टेट को-आॅप. कंझ्युमर्स फेडरेशनने नियमबाह्य खासगी कंत्राटदारांना देण्याच्या प्रकाराला राज्याच्या पणन संचालकांनी लगाम लावण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्या आदेशाला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती देत कंत्राटदारांची देयके अदा करण्याचा मार्ग मोकळा केला. विशेष म्हणजे, खासगी कंत्राटदारांना वस्तूपुरवठ्यासाठी दोनशे टक्केपेक्षाही अधिक दराचा मलिदा देण्यात आल्याने शासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शालेय पोषण आहार पुरवठ्याचे काम खासगी कंत्राटदारांकडून करवून घेण्यास महाराष्ट्र को-आॅप. कंझ्युमर्स फेडरेशनला राज्याच्या पणन संचालकांनी मज्जाव केला. त्यानंतरही पोषण आहार पुरवठ्यासाठी मुंबई, उस्मानाबाद, अहमदनगर, हिंगोली, नंदुरबार, नागपूर, गोंदिया, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यातील कामांची खिरापत वाटण्यात आली. पणन संचालकांच्या आदेशामुळे देयकं कशी सादर करावी, या अडचणीत कंझ्युमर्स फेडरेशन सापडले. अकोला जिल्ह्यात कंझ्युमर्स फेडरेशनने खासगी कंत्राटदाराला काम दिल्याचा करारनामा २९ जूून २०११६ रोजी केला, हे विशेष; मात्र पणन संचालकांचा आदेश कायद्यातील तरतुदीनुसार असल्याने कंझ्युमर्स फेडरेशनने आदेशानंतर खासगी कंत्राटदारांसोबत केलेले करारनामे अवैध ठरले होते. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडे पुरवठ्याच्या कामांची देयकं सादर करण्यावरही निर्बंध आले. ते हटवण्यासाठी कंझ्युमर्स फेडरेशनसोबत कंत्राटदारही कामाला लागले. पणन संचालकांच्या आदेशावर कंझ्युमर्स फेडरेशनने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे धाव घेतली. विभागाकडूनच सहकार चळवळीला नख!पणन संचालकांना सहकार कायद्यातील तरतुदीनुसार केलेल्या तपासणीत महाराष्ट्र स्टेट को-आॅप. कंझ्युमर्स फेडरेशनने शासनाच्या विविध शासकीय विभागाची कामे घेतली. ती कामे ग्राहक संस्थांना (कंझ्युमर्स सोसायटी) देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, त्या संस्था फेडरेशनच्या सभासदही आहेत. त्यांना डावलून शालेय पोषण आहाराचे काम खासगी कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आले. ही बाब सहकार चळवळीचा विकास आणि आर्थिक मजबुतीच्या विरोधात आहे. त्यातून फेडरेशनच्या उपविधीचेही (बायलॉज) उल्लंघन करण्यात आले. हा प्रकार तातडीने बंद करून ग्राहक संस्थांनाच काम देण्याचे आदेश राज्याचे पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी १६ जून २०१६ रोजी दिले होते. शासनाची अशीही पारदर्शकताखासगी कंत्राटदारांसह कंझ्युमर्स फेडरेशनने नऊ जिल्ह्यातील कंत्राटदारांची काळजी घेत याचिका दाखल केली. त्यावर शासनानेही कंत्राटदारांच्या वस्तूंना दोनशे टक्के अधिक दराची जाणीव ठेवत ५० कोटींची देयके अदा करण्याचा मार्ग मोकळा केला.