अकोला : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मूर्तिजापूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मूर्तिजापुरातील समतानगरात राहणाऱ्या संतोष कावरे यांची तालुक्यातील भटोरी येथे शेती आहे. कावरे यांच्याकडे साडेसात एकर शेती होती. ते कर्जबाजारी होते. सततची नापिकी आणि कर्जामुळे ते वैफल्यग्रस्त होते. अखेर रविवारी त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.आत्महत्येची दुसरी घटना तालुक्यातील रोहणा येथे शुक्रवारी घडली. प्रकाश रामकृष्ण मुळे यांनी शुक्रवारी शेतामध्ये विष प्राशन केले होते. त्यांना दर्यापूर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यांच्याकडे तीन एकर शेती होती. त्याच्यावर १५ लाखांचे कर्ज थकीत होते. (प्रतिनिधी)
अकोल्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: November 2, 2015 03:05 IST