शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

ठाणे पोस्टातील दोन वृद्ध झाडूवालींना मिळाले निवृत्तिवेतन

By admin | Updated: April 13, 2017 00:59 IST

पोस्टल स्टोअर्स डिपार्टमेंटच्या ठाणे शहरातील दोन कार्यालयांमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ हंगामी सफाई कर्मचारी म्हणून काम करून आता वयाची सत्तरी पार केलेल्या

मुंबई : पोस्टल स्टोअर्स डिपार्टमेंटच्या ठाणे शहरातील दोन कार्यालयांमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ हंगामी सफाई कर्मचारी म्हणून काम करून आता वयाची सत्तरी पार केलेल्या दोन महिलांना तीन महिन्यांत रीतसर पेन्शन देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. अजय गडकरी यांनी दिलेल्या या निकालाने शांताबाई जी. नाईक आणि सीताबाई आर. मोरे या दोघींना न्याय मिळाला आहे. मुंबईत सातरस्ता येथील रसूल जिवास चाळीत राहणाऱ्या शांताबाई आज ७६ वर्षांच्या आहेत. तर, आंबेडकर नगर, कसारा येथील सीताबाई ७१ वर्षांच्या आहेत. निवृत्तीचे ६० वर्षे हे नियत वय उलटून अनुक्रमे १६ व ११ वर्षे झाल्यानंतर त्यांना न्याय मिळाला आहे. दोघी टपाल खात्यात ‘ग्रुप डी’ कर्मचारी म्हणून नियमित नोकरीत होत्या, असे मानून नेमणुकीच्या दिवसापासून ते निवृत्तीच्या तारखेपर्यंत सेवाकाळ गृहीत धरून पेन्शनचा नियमानुसार हिशेब करावा व ते तीन महिन्यांत सुरू करावे, असा आदेश न्यायालयाने दिला.शांताबाई आणि सीताबाई टपाल खात्याच्या दोन कार्यालयांमध्ये झाडलोट करणे, पाणी भरून ठेवणे व स्वच्छतागृहे स्वच्छ करणे अशी कामे सकाळी तीन तास व संध्याकाळी तीन तास करत असत. वयाची साठी उलटून गेल्यावरही हे काम त्यांनी केले. तरीही त्यांना हंगामी नोकरीत ठेवले. याविरुद्ध दोघींनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) दाद मागितली. तेव्हा त्यांना पेन्शन द्यावी, असा आदेश न्यायाधिकरणाने दिला. याविरुद्ध टपाल खात्याने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. दोघींची नेमणूक हंगामी म्हणून केली गेली होती व त्या दररोज दोन-तीन तास काम करत होत्या या टपाल खात्याच्या म्हणण्यास पुरावा नाही. सरकारने आदर्श ‘एम्प्लॉयर’ म्हणून वर्तन करणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन सरकार त्यांची पिळवणूक करू शकत नाही, असे खंडपीठाने सुनावले.टपाल खात्यासाठी अ‍ॅड. नीता मसूरकर व अ‍ॅड. एन. आर. प्रजापती यांनी तर, अ‍ॅड. अंजली हेलेकर यांनी ‘अमायकस क्युरी’ म्हणून काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)