शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाचे उद्यापासून दोन दिवसीय अधिवेशन; भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:57 IST

प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच असेल. त्याच वेळी विधान परिषद निवडणुकीच्या विजयाने आत्मविश्वास वाढलेले सरकार अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करेल.

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनास सोमवारपासून (१४ डिसेंबर) मुंबईत सुरुवात होत आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच असेल. त्याच वेळी विधान परिषद निवडणुकीच्या विजयाने आत्मविश्वास वाढलेले सरकार अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करेल.पुरवणी मागण्या मांडून आणि दिवंगत आजी-माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून पहिल्या दिवसाचे कामकाज संपेल. त्यामुळे अधिवेशनाला केवळ एकच दिवस मिळणार आहे. कोरोनाची परिस्थिती राज्यात परिस्थिती आटोक्यात आली आहे, ही सरकारसाठी जमेची बाजू असेल. महाविकास आघाडी सरकारला अलीकडेच एक वर्षे पूर्ण झाले. तिन्ही पक्षांमध्ये एकी असल्याचे विधान परिषद निवडणूक निकालातून दिसले. अधिवेशनातही तसेच चित्र बघायला मिळेल, असे दिसते.विधिमंडळ अधिवेशनालाही कोरोनाचा फटका बसला आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार नुकताच सुरू झाला होता, तेव्हा अर्थसंकल्‍पीय अधिवेशन सुरू होते. ते गुंडाळावे लागले होते. पावसाळी अधिवेशनही लांबले व ते सप्टेंबरमध्ये घेण्यात आले. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनाचे सावट लक्षात घेता, मुंबईतच हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय कामकाज सल्‍लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हे अधिवेशनही ७ डिसेंबरला घेण्यात येणार होते. मात्र, आता १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. महिला, बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात शक्ती कायद्याचे विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.