शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अभियंत्यांचे दोन दिवशीय सामुहीक रजा आंदोलन; ठाणे जि.प.च्या ८३ अभियंत्यांचा सहभाग

By सुरेश लोखंडे | Updated: March 20, 2018 16:19 IST

सामुहीक रजा घेऊन राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या राज्यस्तरीय आंदोलनाव्दारे अभियंत्यांनी केला. या आदोलनाची दखल न घेतल्यास अभियंत बेमुदत संपाचे रणशिंग फुंकण्याच्या प्रयत्नात आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांमधील बांधकाम, पाणी पुरवठा, लघू पाटबंधारे आदी विभागांती अभियंते या सामुहीक रजा आंदोलनास सहभागी आहेत.

ठळक मुद्देराज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील (जि.प.) सुमारे तीन हजार ५०० अभियंत्यांनी सोमवारपासून सामुहीक रजा आंदोलन छेडले ठाणे जिल्हा परिषदेच्या सुमारे ८३ अभियंत्यांनी सहभाग २४ वर्षांच्या सेवेनंतरची हक्काची पदोन्नती या प्रमुख मागणीसह अतांत्रिक कामांना विरोध आदी मांगण्यासाठी अभियंत्यांनी प्रथम हे दोन दिवशीय रजा आंदोलन छेडले

ठाणे : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील (जि.प.) सुमारे तीन हजार ५०० अभियंत्यांनी सोमवारपासून सामुहीक रजा आंदोलन छेडले. यात ठाणे जिल्हा परिषदेच्या सुमारे ८३ अभियंत्यांनी सहभाग घेतला. आंदोलनाच्या आजच्या दिवशी देखील अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आदोलन सुरू ठेवून घोषणाबाजी सुरू ठेवली आहे.सामुहीक रजा घेऊन राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या राज्यस्तरीय आंदोलनाव्दारे अभियंत्यांनी केला. या आदोलनाची दखल न घेतल्यास अभियंते बेमुदत संपाचे रणशिंग फुंकण्याच्या प्रयत्नात आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांमधील बांधकाम, पाणी पुरवठा, लघू पाटबंधारे आदी विभागांती अभियंते या सामुहीक रजा आंदोलनास सहभागी आहेत. ठाणे जि.प.च्या अभियंत्यांचे नेतृत्व जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मोहन पवार यांच्यासह जिल्हा शाखेचे अध्यक्ष अभियंते डी.ए.गीते, सचिव अरूण बडगुजर, विभागीय उपाध्यक्ष प्रशांत खैरनार आदींच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे ८३ अभियंते यात सहभागी झाले.विविध मागण्यांसाठी अभियंत्यांनी दोन दिवशीय सामुहीक रजा आंदोलन सुरू केले आहेत. परंतु त्यांच्या विभागांमधील अन्य कर्मचारी वर्ग कार्यालयात कार्यरत असल्याचे प्रतिपाद ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील यांनी केले.२४ वर्षांच्या सेवेनंतरची हक्काची पदोन्नती या प्रमुख मागणीसह अतांत्रिक कामांना विरोध आदी मांगण्यासाठी अभियंत्यांनी प्रथम हे दोन दिवशीय रजा आंदोलन छेडले आहे. सदनशीर मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा अभियंत्यांकडून देण्यात आला. ऐन उन्हाळ्यात अभियंत्यांनी आंदोलन हाती घेतले. या आंदोलनाच्या कालावधीत सर्वाधिक परिणाम पाणी पुरवठा विभागाच्या अत्यावश्यक सेवेवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद