शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

रेल्वे प्रवाशांचा दोन कोटींचा विसराळूपणा

By admin | Updated: January 5, 2017 04:15 IST

रेल्वे प्रवासात बॅग आणि मौल्यवान वस्तू विसरल्याच्या किंवा गहाळ झाल्याच्या घटनांमध्ये गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे

मुंबई : रेल्वे प्रवासात बॅग आणि मौल्यवान वस्तू विसरल्याच्या किंवा गहाळ झाल्याच्या घटनांमध्ये गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे. त्याचा मनस्ताप प्रवाशांना होतानाच, लोहमार्ग पोलिसांनाही होतो. २0१६ मध्ये रेल्वे प्रवाशांच्या विसरभोळेपणामुळे तब्बल दोन कोटींपेक्षा अधिक बॅग आणि मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याचे समोर आले आहे. यात तब्बल ८0 लाख किमतीचे लॅपटॉप आणि २६ लाख रुपये किमतीच्या सोन्याचा समावेश आहे. मदतीसाठी ९८३३३३११११ हा हेल्पलाइन क्रमांक आहे. या हेल्पलाइनवर बॅग विसरल्याच्या किंवा गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी किंवा मदतीसाठी कॉल येतात. २0१५ मध्ये ११ हजार ७0७ कॉल बॅग विसरल्याच्या आणि त्या गहाळ झाल्याचे आले होते. यामध्ये ५२ लाख रुपये किमतीचे १३५ लॅपटॉप आणि ६८४ ग्रॅमचे १३ लाख ३८ हजार किमतीच्या सोन्याचा समावेश होता. लोहमार्ग पोलिसांकडून त्याचा शोध घेऊन बॅग शोधून दिल्या जातात. २0१६ मध्येही याचे प्रमाण बघितल्यास ते वाढल्याचेच दिसते. बॅग विसरल्याच्या आणि गहाळ झाल्याचे १२ हजार ९२९ कॉल लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाइनवर आले. त्यापैकी २ हजार ७८३ बॅगच प्रवाशांना परत करण्यात आल्या. त्यामध्ये सर्वाधिक तब्बल ८0 लाख ४८ हजार रुपये किमतीचे २0६ लॅपटॉप, २६ लाख ६0 हजार ५८0 रुपये किमतीचे ९५३.६ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे, तर २0 लाख ८८ हजारांचे २0५ मोबाइलही असल्याची माहिती देण्यात आली. रोख रक्कम आणि अन्य साहित्य असे एकूण २ कोटी ८ लाख ९१ हजार ८३३ रुपयांचे साहित्य परत करण्यात आले. (प्रतिनिधी)रोख रक्कमही ताब्यात : रोख रक्कम असलेली बॅगही प्रवासी रेल्वे प्रवासात विसरतात. अशी एकूण २0 लाख ७१ हजार १३0 रुपये रोख रक्कम, तर ६0 लाख २३ हजार ७८५ किमतीचे इतर साहित्य प्रवाशांना परत करण्यात आले. यात रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल ६९५ पोलिसांना गौरविण्यातही आले.