शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये दोन कंटेनरची धडक होऊन अपघात; वाहतुकीचा पाच तास खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 08:51 IST

नगरपासून दहा किलोमीटर अंतरावर नगर- सोलापूर रस्त्यावरील पारगाव फाटा येथे शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन कंटेनर समोरासमोर धडकले.

ठळक मुद्दे नगरपासून दहा किलोमीटर अंतरावर नगर- सोलापूर रस्त्यावरील पारगाव फाटा येथे शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन कंटेनर समोरासमोर धडकले.  अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.

अहमदनगर, दि. 15 - नगरपासून दहा किलोमीटर अंतरावर नगर- सोलापूर रस्त्यावरील पारगाव फाटा येथे शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन कंटेनर समोरासमोर धडकले.  या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. अपघात झाल्यानंतर अहमदनगरमध्ये पाऊस सुरू झाला त्यामुळे योग्यवेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले नसल्याचा आरोप केला जातो आहे. त्यामुळे पारगावपासून नगरपर्यंत दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळी आठपर्यंत ही वाहने तशीच रस्त्यावर उभी होती. 

हा रस्ता एमआयआरसी या लष्कर  हद्दीतून जातो. पोलीस नसल्यामुळे अखेर लष्कराला वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. लष्कराने काही वेळातच वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास वाहने जाण्यास सुरुवात झाली. नगर-सोलापूर रोड आधीच मोठ्या प्रमाणात खराब झाला असून पावसामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. जड वाहतुकीमुळे हा रस्ता व इतर वाहनांसाठी जणू बंदच होतो. इतर लहान वाहनधारक तसेच  दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. दिवसाचे चोवीस तास सुरू असलेल्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाकोडी फाटा, दरेवाडी तसेच या परिसरातील लोकांचा प्रवास जीवघेणा झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघात