शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्स्टेबलची आत्महत्येप्रकरणी आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 20:38 IST

महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येनंतर ‘आरोपी’च्या पिंज-यात असलेले मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांना शोधण्यासाठी कळवा पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. एका महिला पोलिसाच्या आत्महत्येप्रकरणी आपल्याच वरिष्ठ पोलीस अधिका-याला शोधण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली आहे.

ठाणे, दि. 8 - महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येनंतर ‘आरोपी’च्या पिंज-यात असलेले मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांना शोधण्यासाठी कळवा पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. एका महिला पोलिसाच्या आत्महत्येप्रकरणी आपल्याच वरिष्ठ पोलीस अधिका-याला शोधण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली आहे.ठाण्यात घर नसल्यामुळे निपुंगे हे टेंभीनाका येथील पालिसांच्या विश्रांतीगृहात वास्तव्याला होते. त्यांचे कुटुंब पुण्याला होते. तर नाशिकलाही त्यांचे एक घर आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी त्यांना शोधण्यासाठी ठाण्यातील दोन वेगवेगळी पथके पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे फोनही नॉट रिचेबल आहेत. ६ सप्टेंबरपासून शुक्रवारी तिस-या दिवशीही ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी सांगितले.कनिष्ठ महिला कर्मचारी सुभद्रा हिला एसीपी निपुंगे यांनी मानसिक त्रास दिल्याची तक्रार तिने तिचा भावी पती अमोल फापाळे यांच्याकडे केली होती. त्यामुळेच आपण त्यांना भेटू आणि त्यांच्याशी सविस्तर बोलू, असेही अमोलने तिला सुचविले होते. तसा फोनही निपुंगे यांना केला होता. त्यावेळी ‘तुम्ही येऊ नका मीच येतो,’ असे निपुंगेंनी त्यांना सुचविले होते. हीच माहिती अमोलने सुभद्राचा नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल भाऊ सुजित पवार याला दिली. सुजित नवी मुंबईतून ठाण्याकडे येण्यासाठी निघाला, तोपर्यंत सुभद्राने आत्महत्या केल्याचा दुसरा फोन अमोलने सुजितला केला. तो सुभद्राच्या घरी येईपर्यंत तिने आत्महत्या केल्याची माहिती देण्यासाठी अमोल कळवा पोलीस ठाण्यात गेला होता. अमोल आणि सुजित जेव्हा पुन्हा सुभद्राच्या घरी आले तेव्हा तिथे एसीपी निपुंगेही आले. पण तिने आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी तिथून पळ काढला. आता प्रत्यक्ष घटनेच्या वेळी तिथे हजर असलेला तिचा भावी पती अमोल आणि तिथून पळ काढणारे निपुंगे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यात अमोलची गेल्या दोन दिवसांपासून कळवा पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.निपुंगे यांनी सुभद्राचा मानसिक छळ केल्याचा तसेच ‘तुझ्या डयुटीची सेटींग करुन देतो, तू मला भेटायला ये,’ असे ते सांगत असल्याचेही तिने सांगितल्याचा त्याने पुनरुच्चार केला. दरम्यान, निवृत्तीला अवघी पाच वर्षे शिल्लक असलेल्या निपुंगे यांच्यावर आलेल्या आरोपामुळे ठाणे शहर पोलीस वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरु आहे.