शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

प्रत्येक गावातून दोन उमेदवार; लोकसभेला करणार धमाका, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 06:18 IST

अहमदनगर जिल्ह्यातही सकल मराठा समाजाची बैठक झाली असून  जिल्ह्यात ५०० उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा कार्यकारिणीने २५३४ मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.

मुंबई: आरक्षणावरुन मराठा समाजामध्ये खदखद असून येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शासनाने दिलेले एसईबीसी १० टक्के आरक्षण मनोज जरांगे पाटील मान्य करीत नाहीत, म्हणून त्यांच्याविरोधात एसआयटी लावून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्षांविरोधात असहकार आंदोलन छेडण्याची तयारी सुरु आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातही सकल मराठा समाजाची बैठक झाली असून  जिल्ह्यात ५०० उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा कार्यकारिणीने २५३४ मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच हजार उमेदवार- छत्रपती संभाजीनगर जिल्हा सकल मराठा समाजाची बैठक शनिवारी  पार पडली. बठकीत सुमारे पाच हजार उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले की, जरांगे यांनी दोन शिव्या घातल्या तर शासनाने त्यांच्यावर एसआयटी नियुक्त केली. 

- मराठा समाजाला यापूर्वी दोनवेळा दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. असे असताना पुन्हा तसेच ५० टक्क्यांबाहेर आरक्षण माथी मारण्यात आले. हे आरक्षण जरांगे यांनी नाकारल्याने त्यांच्याविरोधात सरकारने कट रचण्यास सुरुवात केल्याने मराठा समाज संतप्त आहे. 

राजकीय पक्षांच्या मोर्चा, सभा, बैठकांवर बहिष्कार  कोणत्याही राजकीय पक्षाची सभा असो किंवा मोर्चा, बैठकांवर मराठा समाजाने बहिष्कार घालावा अथवा निषेधाचे फलक घेऊन उभे राहावे, असा निर्णय घेण्यात आला.  

बैठकीत मंजूर झालेले ठरावराजकीय स्टेजवर मराठा समाज जाणार नाही, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही. त्यामुळे जरांगे-पाटील ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असा ठराव घेण्यात आला.

आमदार पुत्राला उद्घाटन करण्यास केला विरोधतुगंत (ता. पंढरपूर) येथे एका विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त माढा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे आले होते. यावेळी गावातील मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेऊन रणजितसिंह शिंदे यांना घेराव घातला. गावात नेत्यांना बंदी असताना तुम्ही गावात का आलात? तुम्हाला कुणबी दाखला आहे, मग आम्हाला नको का? असे म्हणत रणजितसिंह यांना आंदोलकांनी गावातून काढता पाय घेण्यास भाग पाडले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक