शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पदवीधर निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट, शुभांगी पाटील नॉट रिचेबल, मविआचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 15:19 IST

नाशिक पदवीधरची जागा कोण लढवणार यावर अद्यापही मविआत गोंधळ सुरू आहे. त्यात नाशिकमध्ये अपक्ष म्हणून फॉर्म भरलेल्या शुभांगी पाटील यांनी ठाकरेंची भेट घेत ठाकरेंचा पाठिंबा असल्याचं सांगितले होते

नाशिक - नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरताच मुलासाठी माघार घेतली. तर सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. घडलेल्या प्रकारामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. त्यानंतर भाजपानेही या जागेवर कुणीही उमेदवार दिला नाही. 

नाशिक पदवीधरची जागा कोण लढवणार यावर अद्यापही मविआत गोंधळ सुरू आहे. त्यात नाशिकमध्ये अपक्ष म्हणून फॉर्म भरलेल्या शुभांगी पाटील यांनी ठाकरेंची भेट घेत ठाकरेंचा पाठिंबा असल्याचं सांगितले होते. परंतु अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याचं समोर आले आहे. तर महाविकास आघाडीचा पाठिंबा मलाच मिळेल. शुभांगी पाटील यांना अधिकृतपणे ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला नाही असा दावा नाशिकचे दुसरे अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी केला आहे. सुभाष जंगले यांनी  अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जंगले हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत. 

नाशिक निवडणुकीत क्षणाक्षणाला उत्सुकता वाढत आहे. धनंजय जाधव यांनी या निवडणुकीत माघार घेतली आहे. भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. शुभांगी पाटील यांचं मन वळवण्यात अद्याप त्यांना यश आले नाही. शुभांगी पाटील या भाजपाकडून निवडणूक लढवण्यात इच्छुक होत्या. परंतु भाजपानं उमेदवारीबाबत सस्पेन्स ठेवल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. 

अपक्ष उमेदवार धनराज विसपुतेंनी घेतली फडणवीसांची भेटधनराज विसपुते यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. १ तास आमची चर्चा झाली. या भेटीत विसपुतेंनी भाजपाकडे पाठिंबा मागितला परंतु पक्षाची भूमिका योग्य वेळी जाहीर करू असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती धनराज विसपुतेंनी दिली.

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं या निवडणुकीला रंगत आली. सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेसचं अधिकृत तिकीट मिळालं तरी त्यांनी अर्ज भरला नाही. सत्यजित तांबे यांनी भाजपाचा मला पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते हे पाहणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसSatyajit Tambeसत्यजित तांबेElectionनिवडणूक