शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सत्तावीस हजार बालकांना डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 01:59 IST

मावळ तालुक्यामध्ये २९५ बूथवर २७ हजार ८ बालकांना पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत डोस देण्यात आला.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यामध्ये २९५ बूथवर २७ हजार ८ बालकांना पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत डोस देण्यात आला. लसीकरणाचे ९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.लसीकरण शिबिराची सुरुवात येथील पंचायत समितीत आमदार संजय भेगडे यांच्या हस्ते तर सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अविनाश बवरे, गटविकास अधिकारी नीलेश काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, लायन्स क्लबचे कुपोषणमुक्त पुणे जिल्ह्याचे प्रांत प्रमुख भूषण मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.अंगणवाडी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, टोल नाके, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अशा २९५ ठिकाणी सकाळी ८ ते सायं. ५पर्यंत बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या, महिला मंडळे, बचत गट, सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोहारे, विस्तार अधिकारी सुधाकर म्हंकाळे, आरोग्य सुपरवायझर हरिष शेलार व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले. (वार्ताहर)>पवनानगर परिसरात ३४५० बालकांना लसीकरणपवनानगर : येथे विशेष पोलिओ मोहिमेंतर्गत ३४५० मुलांना पोलिओ डोस पाजण्यात आले. रविवारी सकाळी पुणे जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले यांच्या हस्ते लोहगड येथील बूथवर लहान मुलाला पोलिओ डोस पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. येळसे येथील आरोग्य केंद्रावर सरपंच शिवाजी सुतार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेसाठी पवनानगर व परिसरामध्ये ५४ बूथ, दोन मोबाइल बूथ व ट्राझीस्ट टीम तयार करण्यात आली होती. यासाठी एकूण १२८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते, अशी माहिती अरोग्य अधिकारी डॉ. वामन गेंगजे यांनी दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्या धानिवले, येळसेचे सरपंच सुतार, उपसरपंच नवनाथ ठाकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गेंगजे, लोहगड सोसायटीचे अध्यक्ष गणेश धानिवले आदी उपस्थित होते. धानिवल्या म्हणाल्या की, येळसे प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या सर्व टीमने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले. ९८ टक्के लाभार्थींना या मोहिमेचा फायदा झाला.>देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वैद्यकीय विभागामार्फत रविवारी देहूरोड परिसरातील विविध भागांत ५५३० पैकी ३२६५ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. २२ केंद्रांसह तीन फिरत्या अशा एकूण २५ केंद्रांवर सोय करण्यात आली होती. पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी पुढील तीन दिवसांत घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार असल्याचे बोर्डाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. टी. एम. वाकचौरे यांनी सांगितले. देहूरोडमधील पाच वर्षाखालील ५५३० बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. रविवारी सकाळी बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात बालकांना डोस देऊन मोहिमेचे उद्घाटन आरोग्य समिती अध्यक्षा सारिका नाईकनवरे, डॉ. वाकचौरे, पी. के. वेळापुरे यांनी बालकांना डोस पाजून केले. शेलारवाडीत सदस्य रघुवीर शेलार यांच्या हस्ते ङोस पाजून उद्घाटन करण्यात आले.रविवारी पोलिओ डोसपासून वंचित राहिलेल्या बालकांना बोर्डाच्या कर्मचारी वर्गामार्फत सोमवार, मंगळवार व बुधवारी परिसरातील घरोघरी जाऊन डोस देण्याचे नियोजन करण्यात आले. या मोहिमेसाठी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांसह, ४० अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच राज्य सरकारी रुग्णालयातील २०, विद्यार्थी व परिचारिकांचे सहकार्य घेण्यात आले. (वार्ताहर)