शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सत्तावीस किलोमीटर धावून जुळल्या रेशीमगाठी !

By admin | Updated: February 4, 2017 00:49 IST

आगळावेगळा सोहळा : मेढा ते सातारा दरम्यान ठिकठिकाणी नवनाथ अन् पूनम यांचे स्वागत; वऱ्हाडीही धावले

मेढा : घरातून पळून जाऊन लग्न करणारी जोडपी आजपर्यंत जगानं खूप बघितली, परंतु घरापासून २७ किलोमीटर पळत जाऊन लग्न करणाऱ्या अवलिया दाम्पत्याच्या अनोख्या प्रयोगाला सातारकरांनी सलाम केला. लग्न सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच घडतो. तो कायमस्वरूपी लक्षात राहावा म्हणून प्रत्येकाची धडपड असते. यामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्राचीही छाप उमटते. असाच आगळावेगळा विवाह सोहळा शुक्रवारी साताऱ्यात पार पडला. जावळी तालुक्यातील काळोशीतील धावपटू नवनाथ डिगे व पूनम चिकणे हे २७ किलोमीटर धावत जाऊन रेशीमगाठीत अडकले.सध्याच्या युगात प्रत्येकजण घड्याळाच्या काट्याबरोबर धावत आहे. परंतु यामध्ये स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हेच धावणे शरीरासाठी आरोग्यपूर्ण होऊ शकते, हा संदेश देत हिल मॅरेथॉन असोसिएशनचे सदस्य नवनाथ जोतिबा डिगे यांनी पूनम रघुनाथ चिकणे हिच्या समवेत मेढा ते सातारा धावत येऊन साताऱ्यातील विवाह नोंदणी कार्यालयात लग्न केले. यावेळी नवनाथ व पूनम यांच्या समवेत जिल्हा हिल मॅरेथॉनचे डॉ. सुधीर पवार, अ‍ॅड. कमलेश पिसाळ, विठ्ठल जाधव, डॉ. प्रतापराव गोळे यांच्यासह उपस्थित वऱ्हाडीही धावले. यामध्ये करंजेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही समावेश होता. नववधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी मेढा-सातारा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.नवनाथ डिगे हे अनेक वर्षांपूर्वी धावत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते दररोज पाच किलोमीटर धावतात. त्यांनी आत्तापर्यंत २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत दहा वेळा सहभाग घेतला. तर मुंबईत नुकत्याच झालेल्या ४२ किलोमीटर स्पर्धेचे अंतरही त्यांनी पार केले होते. त्यांचा विवाह जावळी तालुक्यातीलच गांजे लिगाडेवाडी येथील पूनम रघुनाथ चिकणे हिच्याशी ठरला.‘माझे लग्न वधूबरोबर धावत जाऊन करायचे आहे,’ असा निर्धार नवनाथ यांनी केला. हा निर्धार त्यांनी घरी बोलून दाखविल्यावर घरातूनच प्रथम विरोध झाला. शेवटी अनेक मार्गांनी पटवून देण्यात ते यशस्वी झाले. यासाठी मेढ्यातील डॉ. सुधीर पवार यांनी पुढाकार घेतला. सर्वानुमते शुक्रवार, दि. ३ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचे ठरले. त्यानुसार मेढा ते सातारा हे २७ किलोमीटर अंतर धावत पार करण्यसाठी लागणाऱ्या वेळेचे नियोजन करण्यात आले. दोघांनीनी पहाटे सहा वाजता साताऱ्याच्या दिशेने धावण्यास सुरुवात केली. यावेळी वधू-वरासमवेत हिल मॅरेथॉनचे पदाधिकारी, वऱ्हाडीही होते. मेढ्यातून सहायक पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे, तहसीलदार रोहिणी आखाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वधूवरांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. तर साताऱ्यात अमित कदम, कविता जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादनपोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते विवाह नोंदणी कार्यालयात गेले. यावेळी डॉ. सुचित्रा काटे, अनुराधा दिवेकर, अश्विनी देव, चंद्रकांत घोरपडे, दीपक बनकर उपस्थित होते. त्याच्यासाठी ‘ती’ही धावली...नवनाथ डिगे व पूनम यांचा साखरपुडा ११ डिसेंबर, २०१६ रोजी झाला. त्यावेळी विवाह धावत जाऊन करण्याचा मनोदय नवनाथ यांनी बोलून दाखविला. या संकल्पनेला साऱ्यांनीच प्रतिसाद दिला. नवनाथ यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतल्याने त्यांचा दररोजचा पाच किलोमीटर धावण्याचा सराव होता. मात्र पूनम हिने साखरपुड्यानंतर दररोज २ ते ३ किलोमीटर धावण्याचा सराव सुरू केला. साखरपुड्यानंतर पूनमने गांजे या डोंगरकपारीच्या गावातील शेतात रानात, बांधावरुन धावण्याचा सराव केला. ज्याच्याबरोबर आयुष्याची साथ आहे. त्याच्या साथीने धावण्याचा संकल्प सोडून ‘हम साथ साथ है’ हे आपल्या कृतीतून तिने दाखवून दिले. सातारा हिल मॅरेथॉनमधून प्रेरणामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने नवनाथ यांचा जिल्हा हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क आला. त्यातून डॉ. सुधीर पवार, डॉ. कमलेश पिसाळ यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे नवनाथ डिगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.