शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

तब्बल बारा तास वीज गुल

By admin | Updated: May 18, 2016 02:00 IST

ऐन उन्हाळ्यात मध्यरात्री एक ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल १२ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रचंड उकाड्याने व डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले

देहूगाव : ऐन उन्हाळ्यात मध्यरात्री एक ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल १२ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रचंड उकाड्याने व डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले. यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. महावितरणचा भोंगळ कारभाराचा फटका हा वारंवार नागरिकांना बसत आहे. समस्यांचा पाढाच मंगळवारी पुन्हा ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांच्या पुढे वाचत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अशा विविध समस्यांबाबत ‘लोकमत’ने मागील आठवड्यात वृत्तमालिका प्रसिद्ध केली.वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला असल्याने येथील नागरिक हैराण झाले होते. तब्बल १२ तासांनतर तात्पुरत्या स्वरूपात चेंज ओव्हर घेऊन हा पुरवठा सुरळीत करण्यात आला. विद्युतपुरवठा खंडित होऊन १० तास उलटले, तरी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने सरपंच हेमा मोरे यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. या वेळी उपसरपंच सचिन साळुंके, हेमलता काळोखे, सुनीता टिळेकर, संतोष हगवणे, दिनेश बोडके, राणी मुसुडगे, संभाजी बाळसराफ उपस्थित होते.सोमवार रात्री सुमारे एकच्या सुमारास तळवडे येथे विद्युतपुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम स्वरूप देहू-आळंदी रस्त्यावर देहू इंजिनिअरिंग कंपनीच्या जवळ तांत्रिक दोष निर्माण झाला होता. मात्र तळवडे हद्दीतील दोष दुरुस्त करून तेथील विद्युतपुरवठा पहाटेच सुरळीत करण्यात आला होता. मात्र देहूगावचा विद्युतपुरवठा १० वाजले, तरी सुरळीत झाला नव्हता. यामुळे आज गावात पिण्याचे पाणी येऊ शकले नाही. तर नागरिकांना रात्री एकपासून घरातील एसी, एअर कुलर, पंखे बंद राहिल्याने डासांसह प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याने प्रतिसाद न दिल्याने चिडलेल्या सरपंच मोरे व उपसरपंच साळुंके, सदस्य, ग्रामस्थांनी थेट कार्यालयच गाठले. तेथे त्यांना कोणीही अधिकारी न भेटल्याने वरिष्ठाशी संपर्क करून देहूकरांच्या समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अशी मागणी करीत भेट देण्याची मागणी केली. त्याशिवाय हे टाळे खोलणार नाही असा पवित्रा घेतला. (वार्ताहर)निगडी प्राधिकरण कार्यालयाचे उपअभियंते गुजर हे तातडीने देहूत दाखल झाले. त्यांनी समस्या ऐकून घेत आठ दिवसांत या समस्यांवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची ग्वाही दिली. यानंतर कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले. गुजर यांनी समस्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी येत्या आठवड्यात स्विचिंग स्टेशन सुरू करू. त्याचप्रमाणे वीज बिले वेळेवर व अचूक रिडिंग घेऊन वेळेत वाटप करण्यासंदर्भात संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत. येथील कनिष्ठ अभियंता मोहनन यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.