शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही बारावी प्रवेश ऑफलाइन होणार; ऑनलाइनचा मुहूर्त नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 06:46 IST

२०२०-२१ चे बारावीचे प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर राबविण्याच्या प्रक्रियेस उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत

मुंबई : अकरावीत पाहिजे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून अनेक विद्यार्थी बारावीत महाविद्यालय बदलतात. मात्र ही प्रक्रिया ऑफलाइन होत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. परिणामी ही प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा मानस शिक्षण विभाग दरवर्षी व्यक्त करत असला तरी अद्याप या प्रक्रियेबाबत शासनस्तरावर कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नाहीत. परिणामी, यंदाही हे प्रवेश ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत.यामुळे २०२०-२१ चे बारावीचे प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर राबविण्याच्या प्रक्रियेस उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये अकरावीत मुले नापास होतात किंवा काही कारणांमुळे महाविद्यालय सोडून जातात. परिणामी तेथेही बारावीसाठी काही जागा रिक्त होतात. त्यामुळे त्या जागांवर प्रवेश प्रक्रिया पार पडते. अकरावी आॅनलाइनमध्ये आपल्याला पाहिजे ते महाविद्यालय मिळाले नाही म्हणून सुमारे ३० टक्के विद्यार्थी बारावीच्या या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत असल्याची माहिती दरवर्षीच्या प्रवेशावरून समोर आली आहे.ही सर्व प्रक्रिया आॅफलाइनच होत असल्यामुळे येथे अनेक आर्थिक व्यवहार होतात. त्यामुळे अकरावी प्रवेश आॅनलाइन करण्याच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे मागील चार वर्षांपासून ही प्रक्रिया आॅनलाइन करण्याची मागणी होत असूनही शिक्षण विभागाकडून मात्र याला केराची टोपली दाखवल्याचा आरोप शिक्षण संघटनांकडून होत आहे.विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या ठिकाणाहून महाविद्यालय लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव घराजवळील परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे, विद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे, शाखा बदलणे अशा कारणांसाठी विद्यार्थ्यांना बारावीत महाविद्यालय बदलण्याची संधी मिळते. आता यामुळे महाविद्यालये बदलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडणार आहे. त्यामुळे अकरावी आॅनलाइन प्रवेश नावालाच उरण्याची शक्यता आहे.अकरावी प्रवेशाची गुरुवारपर्यंतची माहितीनोंदणी केलेले विद्यार्थी259348अर्ज पडताळणी झालेले विद्यार्थी214087पसंतीक्रम भरलेले विद्यार्थी84146अर्ज लॉक केलेले विद्यार्थी218531

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या