शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३०० रुपयांत हळदबेणे लागवडीचे यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:40 IST

ग्रासरुटइनोव्हेटर : युवा शेतकरी साहेबराव नागोराव केशेवार यांनी कल्पकतेने मिनी ट्रॅक्टरवर तीनशे रुपयांच्या खर्चात हळद बेणे, बटाटे, अद्रक लावण्याचे यंत्र तयार केले आहे. 

- प्रा.शरद वाघमारे (मालेगाव, जि.नांदेड)

सद्यस्थितीत हळद पीक नगदी पीक म्हणून शेतकरी लागवड करीत आहेत; परंतु पारंपरिक पद्धतीने हळदीचे पीक घेताना खर्चाच्या मानाने उत्पन्न मिळत नाही. एकीकडे खर्च जास्त त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. या पार्श्वभूमीवर अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील युवा शेतकरी साहेबराव नागोराव केशेवार यांनी पारंपरिक पद्धतीने हळद बेणे लागवडीला फारकत देत स्वत:च्या कल्पकतेने मिनी ट्रॅक्टरवर अगदी कमी म्हणजे तीनशे रुपयांच्या खर्चात हळद बेणे, बटाटे, अद्रक लावण्याचे यंत्र तयार केले आहे. यामुळे लागवडीसाठी लागणारा मजुरांचा खर्च वाचून कमी वेळात हळद बेणे लागवड करता येईल, अशा पद्धतीचे पेरणी यंत्र तयार केले आहे.

यासाठी केशेवार यांनी तीन इंच पी.व्ही.सी. पाईप, मोगडा या साहित्याचा वापर केला आहे. मिनी ट्रॅक्टरवर दोन मोगड्यांचा वापर करून त्याला दोरीच्या साह्याने बांधले आहे. हळदीसाठी मोगड्यात एक फुटाचे अंतर ठेवले. यासाठी केशेवार यांना केवळ तीनशे रुपये खर्च आला. हळद, बटाटा, अद्रक लागवड करताना या यंत्राच्या साहायाने फक्त दोन मजूर व एक ट्रॅक्टर चालक लागते. एरवी शेतकरी हळद लागवड करताना एक एकर हळद लागवडीसाठी तीन दिवस लागतात. त्यात वेळ आणि खर्च ही जास्त लागतो.

किमान आठ मजूर आणि दिवसाची मजुरी किमान बाराशे रुपये येते; परंतु केशेवार यांनी हळद बेणे लागवडीसाठी तयार केलेल्या या यंत्रावर एक एकर हळद लागवडीसाठी एकरमध्ये केवळ दोन तासांच्या आत हळद लागवड होते. या पद्धतीने लागवड केल्यास लागवडीचे काम केवळ दोन तासांत होते. केशेवार यांनी स्वत:च्या कल्पकतेने बनविलेले हळद लागवडीचे यंत्र शेतकऱ्यांना सद्य:स्थितीत कमी खर्चात व कमी वेळेत हळद, अद्रक, बटाटे पिकाच्या लागवडीसाठी निश्चितच फायदेशीर ठरते आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र