शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

तुर्भेतील वस्तीत अघोरी प्रकार !

By admin | Updated: June 24, 2016 03:52 IST

तुर्भे नाका हनुमाननगर झोपडपट्टीमध्ये बुधवारी रात्री नरबळीच्या चर्चेने खळबळ उडाली. टेकडीवरील एका घरामध्ये दोन ठिकाणी जवळपास पाच फूट लांब व दोन फूट रूंद खड्डे खणले आहेत

नामदेव मोरे,  नवी मुंबई तुर्भे नाका हनुमाननगर झोपडपट्टीमध्ये बुधवारी रात्री नरबळीच्या चर्चेने खळबळ उडाली. टेकडीवरील एका घरामध्ये दोन ठिकाणी जवळपास पाच फूट लांब व दोन फूट रूंद खड्डे खणले आहेत. रात्री या ठिकाणी अघोरी पूजा सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी जावून पाहणी केली असता घरातील व्यक्तींनी सर्व पूजेचे साहित्य टाकून पलायन केले. ठाणे - बेलापूर रोडला लागून असलेल्या झोपडपट्टीमध्ये हा प्रकार घडला आहे. टेकडीवर असलेल्या घरामध्ये दोन महिन्यांपूर्वी खड्डा खणून त्यामध्ये काहीतरी पुरल्याची चर्चा सुरू झाली होती. नागरिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी दोन बकऱ्यांचा व कोंबडीचा बळी देवून त्या खड्ड्यात पुरल्या आहेत. या प्रकाराविषयी रहिवाशांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. याविषयी चाहूल लागताच घरातील सदस्यांनी तेथून पलायन केले होते. बाहेर नातेवाइकांकडे त्यांनी आश्रय घेतला होता. वटपौर्णिमेच्या रात्री याठिकाणी पुन्हा खड्डा करण्यास सुरवात केली. जवळपास दोन फूट रूंद व पाच फूट लांब, चार फूट खोल खड्डा खोदला आहे. सलग तीन दिवस खड्डा करण्याचे काम सुरू होते. बुधवारी रात्री घरामध्ये पूजेचे साहित्य आणले होते. यामध्ये लिंबू, टाचणी, फुले व इतर वस्तूंचा समावेश आहे. कोंबड्याही त्यांच्याबरोबर असल्याची चर्चा होती. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घरामध्ये अघोरी पूजा सुरू असून नरबळी दिला जाणार असल्याची चर्चा परिसरात पसरली. यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्या ठिकाणी जावून खिडकीतून पाहिले असता मोठा खड्डा करून त्याच्या बाजूला पूजेचे साहित्य ठेवल्याचे लक्षात आले. घरातील सदस्यांना दरवाजा उघडण्यास सांगितले असता त्यांनी दुसऱ्या दरवाजाने पळ काढला. पोलिसांना बोलावून नागरिकांनी घरात प्रवेश केला. घरामध्ये दोन ठिकाणी खड्डा केल्याचे निदर्शनास आले. यामधील एका ठिकाणचा खड्डा बुजविण्यात आला होता. नरबळी देण्याचा किंवा इतर अघोरी जादूटोणा करण्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गुरूवारी दिवसभर याविषयी तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. या ठिकाणी पोलिसांनी तपासणीही केलेली नसल्याचे समजले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही. झालेल्या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील नागरिकांनी लहान मुलांनाही घटना घडलेल्या घरांकडे जाण्यास बंदी घातली आहे. याविषयी सखोल चौकशी करावी. बुजविलेला खड्डा उकरून त्यामध्ये काय पुरले आहे याची माहिती घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. पौर्णिमेच्या दिवसापासून या घरामध्ये खड्डे खोदले जात होते. बुधवारी रात्री तेथे काहीतरी पूजा केली जाणार असल्याची चर्चा होती. नागरिकांनी जावून पाहणी केली असता दोन खड्डे खोदल्याचे व बाजूला पूजेचे साहित्य असल्याचे पहावयास मिळाले. नरबळीच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. - शिवाजी जाधव, सामाजिक कार्यकर्ते, हनुमाननगर‘रात्रीस खेळ चाले’घराला दोन बाजूला दरवाजे आहेत. एका बाजूला खिडकीमधूनही घरात प्रवेश करण्याची सोय आहे. घरातील सदस्य रात्री येथे येत, कधी खिडकीतून आतमध्ये जात. काही वेळेला दरवाजा उघडून आतमध्ये जात, दुसऱ्या बाजूने बाहेर येवून आत आलेल्या दरवाजाला टाळे लावून आतमध्ये जात. पहाटेपूर्वी पुन्हा निघून जात. यामुळे परिसरात ‘रात्रीस खेळ चाले’ अशी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. देवपूजा आवडत नव्हतीशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले की, येथे राहणारी व्यक्ती आमच्या घरात येत नव्हती. आम्ही देवपूजा करतो म्हणून त्यांना राग येत असे. ते देव मानत नव्हते. देवपूजेवरही विश्वास नसल्याचे वारंवार सांगत. असे असताना स्वत:च्या घरामध्ये खड्डे करून पूजा केली जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले आहे.