शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यातील धरणे तुडुंब!; तब्बल ७० टक्के साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे यंदा राज्यातील बहुतांश प्रमुख धरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे यंदा राज्यातील बहुतांश प्रमुख धरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. राज्यात फेब्रुवारीच्या पंधरवड्यातही तब्बल ९४० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणात अवघा ५२० ते ५२५ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.राज्यात २०१८ च्या मान्सूनमध्ये परतीच्या पावसाने ओढ दिली होती. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाने सरासरी देखील गाठली नव्हती. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर, इंदापूर आणि दौंड या भागात तीव्र पाणीटंचाई होती. अनेक ठिकाणी चारा छावण्या उभाराव्या लागल्या. मराठवाड्यात तीच स्थिती होती. यंदा मात्र, मान्सून लांबल्याने धरणे अजूनही भरली आहेत. मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा सुरु होतील. धरणातील पाणीसाठा पाहता यंदाचा उन्हाळा सुसह्य असणार आहे.राज्याची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १ हजार ४४४ टीएमसी आहे.मोठ्या धरणांत पाणीमोठ्या धरणांची क्षमता १ हजार २७ टीएमसी आहे. त्यात ७४७.५९ टीएमसी (७२.७७ टक्के) पाणी आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये १९१.०७ पैकी १०७.८० टीएमसी (५६.४२ टक्के) आणि लघु प्रकल्पांमधे २२५.७६ पैकी ८४.५३ टीएमसी (३७.४४ टक्के) पाणी आहे.

टॅग्स :Waterपाणी