शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

भाषासमृद्धीसाठी प्रयत्न व्हावेत

By admin | Updated: December 9, 2014 00:41 IST

भाषा समृद्ध होण्यासाठी आपण, समाज, शासन आणि प्रशासनाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. कुठलीही भाषा श्रीमंत होण्यासाठी शिक्षण, प्रशासन आणि ज्ञानव्यवहार संबंधित भाषेत होणो गरजेचे आहे.

पिंपरी : भाषा समृद्ध होण्यासाठी आपण, समाज, शासन आणि प्रशासनाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. कुठलीही भाषा श्रीमंत होण्यासाठी शिक्षण, प्रशासन आणि ज्ञानव्यवहार संबंधित भाषेत होणो गरजेचे आहे. प्राथमिकपासून तर उच्च शिक्षणार्पयतचे शिक्षण मराठीतूनच असावे. सर्व ज्ञानशाखा मराठीत असाव्यात, तेव्हा भाषा समृद्ध होईल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आज येथे व्यक्त केले.
पिंपरी, संततकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात दिशा सोशल फाऊन्डेशनच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा काल आज आणि उद्या’ या विषयावर डॉ कोत्तापल्ले बोलत होते. व्यासपीठावर आयुक्त राजीव जाधव,  फाऊन्डेशनचे संस्थापक बाळासाहेब जवळकर, अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे, सुदाम ढोरे आदी उपस्थित होते. यावेळी कोत्तापल्ले यांनी भाषा धोरण, भाषा समृद्धीसाठी शासनास केलेल्या सूचना, भाषेपुढील आव्हाने याविषयावर प्रकाश टाकला. 
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ज्ञानव्यवहार हे मातृभाषेतच व्हायला हवेत. तसेच प्रतिष्ठित लोक कोणती भाषा बोलतात. याचा प्रभाव समाजावर पडत असतो. त्यामुळे प्रतिष्ठितांनी मराठी भाषेचा वापर करावा. तसेच दैनंदिन जीवनातही मातृभाषेचा वापर महत्त्वाचा आहे. शासनास आम्ही मराठी भाषेविषयी सूचना केल्या आहेत. त्यात अनेक मुद्दे समाविष्ठ आहेत. भाषा समृद्ध होण्यासाठी धोरणांची आखनी आणि अंमलबजावणी होणो गरजेचे आहे. नोकरीत मराठी बोलणा:यांना प्राधान्यक्रम द्यावा, तसेच उद्योग क्षेत्रत मोठयाप्रमाणावर मराठीशिवाय इतर भाषेचा वापर केला जातो. उद्योगांतील व्यवहार मराठीत व्हावेत, तसेच महापालिकेत छोटय़ा छोटय़ा कामांना येणारा माणुस सामान्य आहे. निमशासकीय कार्यालयातील व्यवहार मराठीत असतील तर त्याचा त्याला फायदा होईल. आमच्या पुढच्या पीढीचे काय होणार हा आजचा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे भाषाविषयक धोरणांची कडक अंमलबजावणी होणो गरजेचे आहे. औषंधावरील माहितीही मराठीत असावी, बँकींग व्यवहारातही मराठी वापर व्हावा.अशीही सुचना केली आहे. मराठीचा आग्रह धरूण दुस:या इतर कोणत्याही भाषा वापरास हरकत असणार नाही.’’ 
 नाना शिवले यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्ेश, उपक्रम याबद्दल माहिती दिली. श्रीकांत चौगुले यांनी सूत्र संचालन केले. नंदू कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
 
शासन परिपत्रकांची अमंलबजावणी व्हावी
4मराठी राजभाषेचा कायदा झाला तेव्हापासून आजवर शंभरेक परिपत्रके शासनाने काढलेली आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. मंत्रलयातील पाटय़ा, अधिका:यांचे शिक्के, दुकानांवरील पाटय़ाही बदललेल्या नाहीत. मराठी भाषेला प्राधान्य देऊन इंग्रजी किंवा अन्य भाषेचा वापर केला तरी त्यास कोणाचाही विरोध असणार नाही. या परिपत्रकांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही काही सूचना केल्या आहेत. कारवाई किंवा अंमलबजावणी संदर्भात जबाबदारी निश्चित करणो गरजेचे आहे. जे अधिकारी याची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांची वेतनवाढ रोखावी, तसेच जे करतील त्यांचा बढती देताना विचार करावा, असेही कोत्तापल्ले म्हणाले.
म्हणून मराठी माणसांची उपेक्षा
4चित्रपट क्षेत्रतही मोठय़ाप्रमाणावर दादागिरी चालते. मराठी चित्रपटांना थिअटर मिळू दिले जात नाहीत. ही बाबही गंभीर आहे. हिंदीत मराठी माणसांचा प्रवेश कसा होणार नाही, याचे राजकारण केले जाते. श्रीराम लागू किंवा निळू फुले यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना हिंदीत स्थान दिले गेले नाही. ज्या मराठी कलावंतांना काम दिले गेले, ते  दुय्यम दर्जाचे होते. त्यामुळे कामगारपासून कलावंत तंत्रज्ञानर्पयत या क्षेत्रत तीस टक्के मराठी लोक असावेत, अशीही मागणी केल्याचे डॉ. कोत्तापल्ले यांनी सांगितले.