Maharashtra Politics: “बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा”; तृप्ती देसाईंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 05:10 PM2023-04-03T17:10:36+5:302023-04-03T17:12:29+5:30

Maharashtra News: साईबाबांना देव मानत नसतील तर धीरेंद्र शास्त्रींना महाराज म्हणायची काहीच गरज नाही, या शब्दांत तृप्ती देसाई यांनी टीका केली.

trupti desai demands to case against dhirendra krishna shastri of bageshwar dham over statement on sai baba | Maharashtra Politics: “बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा”; तृप्ती देसाईंची मागणी

Maharashtra Politics: “बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा”; तृप्ती देसाईंची मागणी

googlenewsNext

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यानंतर बागेश्वर बागेश्वर बाबा यांनी आता कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा यांनाच देव मानण्यास नकार दिला आहे. यातच साईबाबांवर केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. यातच आता भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

साईबाबांची पूजा केली पाहिजे की नाही? असा प्रश्न बागेश्वर बाबा यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना बागेश्वर बाबा म्हणाले की, गिधाडाचे चामडे पांघरून कोणी सिंह होत नाही, असे विधान केले. तसेच शंकराचार्यांनी साई बाबांना देवाचे स्थान दिलेले नाही. साई बाबा संत असू शकतात. फकिर असू शकतात. पण ते देव होऊ शकत नाही, असे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्टपणे सांगितले. यानंतर आता तृप्ती देसाई आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

तुमचा सनातन धर्म कोणता आहे? आणि तो साईबाबांना देव का मानत नाही?

धीरेंद्र शास्त्रीजी, साईबाबा हे कोट्यवधी भक्तांसाठी देवच आहेत. तुमचा सनातन धर्म कोणता आहे? आणि तो साईबाबांना देव का मानत नाही? हे मला माहिती नाही. परंतु जे लाखो भक्त साईबाबांना देव मानतात, त्यांची श्रद्धा दुखावली आहे. तुम्ही त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते साईबाबांना देव मानत नसतील तर धीरेंद्र शास्त्रींना महाराज म्हणायची काहीच गरज नाही. ते आधीच जोकरसारख्या टाळ्या वाजवत असतात. मध्येच हसत असतात. पण आम्ही तुम्हाला जोकर म्हणणार नाही. कारण आमचा धर्म आम्हाला असे काही शिकवत नाही. आम्ही माणुसकी हाच धर्म मानतो. तो धर्म आम्हाला कुणाच्यात भेदभाव करायला शिकवत नाही. त्यामुळे तुम्ही तातडीने साईभक्तांची माफी मागितली पाहिजे. धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आपल्या शंकराचार्यांनी साई बाबांना देवाचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्यांचे म्हणणे हे बंधनकारक आहे. प्रत्येक सनातनी धर्माने शंकराचार्यांचे ऐकले पाहिजे. कारण शंकराचार्य हे धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणताही संत असतील, मग ते आपल्या धर्माचा का असेना, ते देव होऊ शकत नाहीत. कोणतेही संत असू द्या, मग गोस्वामी तुलसीदास असो, सूरदास असो हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत. काही युगपुरुष आहेत. काही कल्प पुरुष आहेत. परंतु यात कोणीही देव नाही. आम्ही कुणाच्याच भावनेचा अपमान करत नाही, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: trupti desai demands to case against dhirendra krishna shastri of bageshwar dham over statement on sai baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.