शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 06:51 IST

‘अ’ आणि ‘ब’ वर्गांतील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकललेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिला आहे. त्यानुसार राज्यातील २९ हजार ४४३ सहकारी संस्थांची निवडणूक होईल, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी दिली.

सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्य सरकारच्या आदेशानुसार ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर पुढे ढकलल्या आहेत, त्या टप्प्यानुसार १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. ‘अ’ आणि ‘ब’ वर्गांतील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.

सुधारित यादी कार्यक्रम राबवावाn‘क’ वर्गातील ज्या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम मतदारयादी प्रसिद्धीनंतर पुढे ढकललेला आहे, अशा संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाला तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांची मान्यता घेण्यात यावी. nज्या सहकारी संस्थांची मतदारयादी अंतिम करण्याचा कार्यक्रम ज्या टप्प्यावर पुढे ढकललेला आहे, त्या टप्प्यापासून पुढे सुधारित यादी कार्यक्रम राबवावा. nज्या संस्थांना जिल्हा, तालुका, प्रभाग निवडणूक अधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे प्राधिकरणाने अर्हता दिनांक दिला आहे, अशा संस्थांच्या मतदारयाद्या त्या अर्हता दिनांकावर तयार करून निवडणूक प्रक्रिया राबवावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

‘अ’ वर्ग     ४२‘ब’ वर्ग     १,७१६‘क’ वर्ग     १२,२५० ‘ड’ वर्ग     १५,४३५

ज्या संस्थांच्या मतदारयाद्या अद्याप प्रसिद्ध केलेल्या नाहीत, अशा याद्या तयार करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२४ हा अर्हता दिनांक देण्यात आला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024