शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला; १९ जुलै रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 18:01 IST

Washim Zilla Parishad Election : वाशिम जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या रिक्त जागांसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे.

वााशिम : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्यानंतर रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने २२ जून रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार अकोला व वाशिम जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या रिक्त जागांसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे.वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२० मध्ये झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास गवळी यांच्यासह अन्य काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आल्या. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चला आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली काढत, ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून दोन आठवड्यांत पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या या निकालानुसार, ओबीसी प्रवर्गातील वाशिम जिल्हा परिषदेचे १४ व पंचायत समितीच्या २७ सदस्यांची पदे रिक्त झाली. दरम्यान, यासंदर्भात राज्य शासनासह एकूण ११ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीअंती ४ मे २०२१ रोजी सर्व ११ पुनर्विचार (पुनर्विलोकन) याचिका व त्यासोबतचे सर्व स्थगिती मागणारे अर्ज फेटाळल्याने रिक्त जागांसाठी निवडणूक अटळ होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी मतदान आणि २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

असा राहिल निवडणूक कार्यक्रम

  • निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करणे २९ जून
  • नामनिर्देशनपत्र सादर करणे २९ जून ते ५ जुलै
  • नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे ६ जुलै
  • वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ६ जुलै
  • नामनिर्देशन पत्राबाबत अपिल करण्याची अंतिम मुदत ९ जुलै
  • अपिलावर सुनावणी व निकाल १२ जुलै
  • नामनिर्देशनपत्र मागे घेणे १२ जुलै
  • उमेदवारांची यादी व निशाणी वाटप १२ जुलै
  • मतदान १९ जुलै
  • मतमोजणी २० जुलै
टॅग्स :Washim ZPवाशीम जिल्हा परिषदwashimवाशिमElectionनिवडणूक