शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रोमिओंच्या स्टंटबाजीमुळे त्रास

By admin | Updated: July 21, 2016 01:23 IST

खेडच्या पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषत:, विद्यालये किंवा महाविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या सुमारास रोडरोमिओ जाणूनबुजून करीत असलेल्या स्टंटमुळे विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी विद्यालयाच्या वेळेत परिसरात गस्त घालण्याचे लेखी निवेदन बहुळ (ता. खेड) येथील सुभाष विद्यालयाने चाकण पोलीस ठाण्याला सुपूर्त केले आहे. पूर्व भागातील शेलपिंपळगाव, बहुळ, भोसे, रासे, मरकळ, सोळू, आळंदी, कोयाळी आदी गावांत गाड्या विचित्र पद्धतीने चालविण्याचे प्रकार घडत आहेत. दुचाकींना वेगळ्या आणि विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसविलेले आहेत. त्यामुळे गाडीतून वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र आणि कर्कश आवाजही निघतात. ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थिनी या प्रकाराने वैतागल्या असून, बाईकवरून प्रवास करणाऱ्या तरुणींना वाहतुकीदरम्यान त्याचा त्रास होत आहे. बाईक स्टंट करणाऱ्यांमधील काही तरुण धनदांडग्या परिवारातील असल्याने सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी होते. परिणामी, अशा घटना फोफावल्या जाऊ लागल्या आहेत. या उनाडक्या करणाऱ्या मुलांवर कारवाईचा बडगा उगारला जात नाही, असे काही नागरिकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दरम्यान, महाविद्यालयासमोर टवाळखोरांचा त्रास वाढत चालला आहे. भरधाव गाड्या चालविणे, शाळा-महाविद्यालयांच्या समोर विनाकारण चकरा मारणे तसेच शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या सुमारास विद्यार्थिनींना त्रास दिला जात आहे. ज्या रस्त्याचा युवती शाळेत ये-जा करण्यासाठी वापर करतात, त्या ठिकाणी टवाळखोरांच्या टोळ्या बाईक घेऊन बसलेल्या असतात. बाईकचा कर्कश हॉर्न किंवा सायलन्सरचा विशिष्ट आवाज करून विद्यार्थिनींचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. परिणामी, विद्यार्थीनींना खाली मान घालून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. शालेय विद्यार्थिनींना त्रास होत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवून टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.>ज्येष्ठांना नाहक त्रासमहाविद्यालयांसमोर चकरा मारून विद्यार्थिनींना नाहक त्रास देणारे रोडरोमिओ बुलेट दुचाकीचा सर्रास वापर करीत आहेत. सायलेन्सर आणि हॉर्नचा कर्कश आवाज केला जातो. तसेच, सायलेन्सरमधून फटाक्याच्या आवाजाचा बार काढला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास होऊ लागला आहे.>रोडरोमिओंच्या त्रासाला शाळेतील कोणीही बळी पडू नये, या उद्देशाने आम्ही विद्यालयाच्या वतीने चाकण पोलिसांना निवेदन दिले आहे. महाविद्यालयीन वेळेत पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी आम्ही केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही मागणी केली आहे.- पौर्णिमा चव्हाण, प्राचार्या, बहुळ