शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे आदिवासी कबड्डीपटूचा मृत्यू?; शवविच्छेदनाच्या अहवालाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 04:31 IST

हाताच्या शस्त्रक्रियेनंतर मृत्यू

मनोर : लालोंढे फरलेपाडा येथील २३ वर्षीय आदिवासी कबड्डीपटूचा शस्त्रक्रिया झाल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मीलन याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असून, संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मीलन सुभाष निकोले असे त्याचे नाव आहे. तो कबड्डी खेळत असताना त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी मनोर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी दाखल केले होते. त्याचा हात फॅक्चर असल्याने शनिवारी दुपारी दोनच्या दरम्यान, डॉ. सौरभ पुंदे यांनी त्याच्यावर शस्त्रक्रियेला सुरुवात केली. यानंतर, त्याला आॅपरेशन थिएटरमधून जनरल वॉर्डमध्ये ठेवले. साडेसहा वाजेपर्यंत मीलन शुद्धीवर आला नाही. त्याच्या तोंडातून रक्त निघू लागले. त्याचा चुलत भाऊ नितेश व वडिलांनी डॉक्टरांना बोलावले. त्याला तपासले असता, त्याचे निधन झाले आहे, असे डॉ.सौरभ पुंदे व डॉ. आदित्य सातवी यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच आमदार विनोद निकोले, लालोंढे गावातील त्याचे नातेवाईक, मित्र व मनोर गावातील नागरिकांनी गर्दी केली. त्याचा मृतदेह आता जे. जे. हॉस्पिटल, मुंबईला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद मनोर पोलीस ठाण्यात केल्याचे मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रताप दराडे यांनी सांगितले.हाताला मार लागला होता. मात्र, त्याच्या आॅपरेशननंतर तो दगावतो ही गंभीर बाब आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचे निधन झाले आहे. त्या डॉक्टरांवर पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल.- विनोद निकोले, आमदार

त्याच्या हाताचे आॅपरेशन यशस्वीरीत्या पार पडले, परंतु तो शुद्धीवर आला नाही. आम्ही प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचविण्यासाठी अयशस्वी ठरलो. त्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर समजेल.- डॉ. आदित्य सातवी, डॉ सौरभ पुंदे

टॅग्स :Deathमृत्यूKabaddiकबड्डी