शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मजुरीसाठी आदिवासींची धडक

By admin | Updated: November 4, 2016 03:04 IST

जिल्ह्यातील विविध कामांवर केलेल्या कामाची २५ लाख ९१ हजार ६४३ इतकी थकलेली मजुरी तात्काळ मिळावी

पालघर : पालघर जिल्ह्यातील विविध कामांवर केलेल्या कामाची २५ लाख ९१ हजार ६४३ इतकी थकलेली मजुरी तात्काळ मिळावी व नवी कामे मंजूर होऊन रोजगार मिळावा या मागण्यांसाठी जव्हार, डहाणू, विक्र मगड येथील २४१ आदिवासी कुटुंबानी आपल्या कच्याबच्या सह पालघर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज पासून धरणे आंदोलन पुकारले आहे.पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागात पुरेसा रोजगार उपलब्ध होत नसल्याने जव्हार, मोखाडा, विक्र मगड, तलासरी, डहाणू ई. भागातील शेकडो कुटुंबे पोटाची खळगी भरण्यासाठी शहरा कडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत असतात. बांधकाम, वीटभट्टी, मिठागरे आदी. मिळेल त्या ठिकाणी काम करून आपला उदरिनर्वाह करण्याचा प्रयत्न हि कुटुंबे करीत असतात. मात्र त्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलून त्यांची लाखो रुपयांची मजुरी मागील दोन वर्षा पासून थकवली आहे. शासन पुरेसा रोजगार देत नाही आणि केलेल्या कामाचा मोबदला ठेकेदार देत नाही अशा दुहेरी फसवणुकीच्या चक्रव्यूहात हि २४१ कुटुंबे अडकली असून अनेक मुले कुपोषित झाली आहेत.कष्टकरी संघटनेने ३ जून व ३० सप्टेंबर २०१६ रोजी पत्र देऊन व प्रत्यक्ष भेट घेऊन हि बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन मजुरी देण्याची मागणी केली होती. मात्र याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने आज कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वा खाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला असताना स्थानिक पातळीवर काम मिळत नसल्याने स्थलांतर करून शहरी भागात काम करून मिळणाऱ्या मजुरीवरच या सर्व कुटुंबाची भिस्त असते. त्यातच केलेल्या कामाची थकीत मजूरी दोन वर्षा पासून मिळत नसल्याने ही कुटुंबे संतप्त झाली आहेत. जव्हारच्या चांभार शेत वांगड पाड्यातील २१ मजुरांची १८ मुले, चांभार शेत च्या वड पाड्यातील २० कुटुंबातील ७ मुले सध्या कुपोषणाची शिकार बनली आहेत. त्या मुळे थकीत मजुरांची मजुरी तात्काळ मिळावी, मजुरांना त्यांच्या आजारपणाचा खर्च मिळावा, मजुरी बुडविणाऱ्या, थकविणाऱ्या मालकावर वेठबिगार कायद्यांतर्गत कारवाई करावी, साठी त्यांचे हे आंदोलन आहे. जिल्हाधिकारी कार्यालया समोर त्यांनी आज स्वयंपाकही केला. (प्रतिनिधी)