शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यकारक! वृक्षाच्छादन वाढले पण वनक्षेत्र कमी झाले ! राज्याने ५४.४७ चौ.कि.मी. वनक्षेत्र गमावले

By निशांत वानखेडे | Updated: December 26, 2024 19:14 IST

Forest in Maharashtra: महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त वृक्षाच्छादन (१४,५२५ चौ.कि.मी.) आणि कृषिवनीकरण साठ्यांमध्ये पहिल्या स्थानी आहे, तरीही राज्याने एकूण ५४.४७ चौ.कि.मी. वनक्षेत्र गमावले आहे, जे विभागवार आणि जिल्हानिहाय आहे.

- निशांत वानखेडे नागपूर - महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त वृक्षाच्छादन (१४,५२५ चौ.कि.मी.) आणि कृषिवनीकरण साठ्यांमध्ये पहिल्या स्थानी आहे, तरीही राज्याने एकूण ५४.४७ चौ.कि.मी. वनक्षेत्र गमावले आहे, जे विभागवार आणि जिल्हानिहाय आहे. द्विवार्षिक ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ (आयएसएफआर) नुसार, राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांनी वनक्षेत्र गमावले आहे.

आयएसएफआरने विविध श्रेणींमध्ये रेकॉर्डेड फॉरेस्ट एरिया (आरएफए) किंवा ग्रीन वॉश क्षेत्राच्या आत आणि बाहेरचे वनक्षेत्र विश्लेषण केले आहे. त्यानुसार अत्यंत गडद जंगल, मध्यम गडद जंगल आणि खुले जंगल या श्रेणीतील वनक्षेत्र ३६,१११ चौ.कि.मी. आहे, तर आरएफए बाहेरील त्याच श्रेणीतील क्षेत्र १४,७४७ चौ.कि.मी. आहे.

२०२१ ते २०२३ दरम्यानच्या वनक्षेत्र बदल मॅट्रिक्सनुसार घनदाट जंगल १०४१ चौ.कि.मी. आणि मध्यम वनक्षेत्रात ७२३ चौ.कि.मी. चे प्रमाण वाढले आहे. मात्र याच कालावधीत राज्याने १७७८ चौ.कि.मी. खुले जंगल आणि २६७ चौ.कि.मी. झुडपी जंगल गमावले आहे. आरएफए बाहेरील वनक्षेत्राचे प्रमाण २३ चौ.कि.मी. ने वाढले आणि मध्यम २५४ चौ.कि.मी. चा वाढले आहे. मात्र राज्याने २९७ चौ.कि.मी. खुले आणि ३३३ चौ.कि.मी. झुडपी जंगल गमावले.

काेणत्या जिल्ह्यात घटले?|सर्वाधिक वनक्षेत्र कमी झालेल्या २४ जिल्ह्यांमध्ये पालघर (८७ चौ.कि.मी.), नंदुरबार (६५ चौ.कि.मी.), कोल्हापूर (२१ चौ.कि.मी.), गडचिरोली (२० चौ.कि.मी.), यवतमाळ (१२ चौ.कि.मी.), अकोला (१२ चौ.कि.मी.), चंद्रपूर (९ चौ.कि.मी.), धुळे (९ चौ.कि.मी.) इत्यादींचा समावेश आहे. विदर्भात गडचिराेलीत सर्वाधिक वनक्षेत्र घटण्यामागे सुरजागड खाणींसाठी जमिनीचा उपयोग, तसेच एफडीसीएमचे लाँगिंग ऑपरेशन्स व वनपट्टे वितरणाचे कारण तज्ज्ञांकडून दिले जात आहे.

या प्रकल्पातही घटले वनबोरने ४७ हेक्टर (०.४७ चौ.कि.मी.), पेंच ०.८० चौ.कि.मी. (८० हेक्टर), ताडोबा कोर १.२९ चौ.कि.मी., ताडोबा बफर २.२३ चौ.कि.मी., पुणे ५ चौ.कि.मी., संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई ८.६१ चौ.कि.मी., नाशिक २.१२ चौ.कि.मी., मेळघाट २.३३ चौ.कि.मी., पांढरकवडा १.८३ चौ.कि.मी. आणि नवेगाव-नागझिराने १.७४ चौ.कि.मी. वनक्षेत्र गमावले आहे.

असे घटले झुडपी जंगल१९५० ते १९८० दरम्यान वेस्टलॅंड अॅटलसनुसार, महाराष्ट्रातील झुडपी जंगल ४६.५० लाख हेक्टर होते. परंतु १९८५ मध्ये प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार ते ४.९२ लाख हेक्टरच दर्शविले गेले. म्हणजे राज्याने ४१.५ लाख हेक्टर झुडपी जमिनीचे वितरण सर्वोच्च न्यायालयाच्या आणि त्याच्या केंद्रीय सशक्तिकरण समितीच्या (सीईसी) परवानगीशिवाय केले, असे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.

"वनक्षेत्र गमावणे हे वनविभागाच्या चुकीच्या व्यवस्थापनाचे आणि ३३ कोटी वृक्षारोपण योजनेच्या अपयशाचे दाखले आहेत. जर ही योजना यशस्वी झाली असती, तर वनक्षेत्र लक्षणीयरीत्या वाढले असते. वनजमिनींच्या हस्तांतरणासाठी केलेल्या पर्यायी वृक्षारोपणात अनियमितता आढळते.- अनसूया काले छाबरानी, पर्यावरण अभ्यासक

गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसाठी लाखो झाडे तोडली गेली, पण योग्य प्रमाणात वृक्षारोपण केले गेले नाही. त्यामुळे वृक्षाच्छादनात वाढ झाल्याच्या दाव्यावर शंका येते.- डाॅ. जयदीप दास, पर्यावरण रक्षक

टॅग्स :forestजंगलMaharashtraमहाराष्ट्र